मुंबई : तत्कालीन काँग्रेसच्या काळात इशरत जहाँप्रकरणी पी. चिदंबरम् यांनी खोटे प्रतिज्ञापत्र प्रविष्ट केले. पोलीस अधिकार्यांवर चुकीचे गुन्हेही प्रविष्ट करण्यात आले, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाडांसारख्या नेत्यांनी आतंकवादी इशरत जहाँचे उघड समर्थन केले. इशरत जहाँ प्रकरणी पी. चिदंबरम् यांच्यासहित जितेंद्र आव्हाडांवरही शासनाने कारवाई करावी, असे प्रतिपादन धर्माभिमानी श्री. मिलिंद कदम यांनी केले. जोगेश्वरी (पू.) रेल्वे स्थानकाजवळील कॅफे गार्डन् समोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
आंदोलनात वीर सेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, नवयुवक लोकसेवा प्रतिष्ठान, उदय सेवा मंडळ, हिंदु गोवंश रक्षा समिती, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह ५० हून अधिक हिंदु धर्माभिमानी आणि राष्ट्रप्रेमी हातात फलक घेऊन घोषणा देत उपस्थित होते. १५ हून अधिक नागरिक उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनाच्या निमित्ताने केंद्रशासनाला देण्यात येणार्या निवेदनावर शेकडो हिंदु बांधवांनी आपल्या स्वाक्षर्या नोंदवल्या. यातील काही नागरिकांनी त्यांना धर्मकार्याशी जोडण्याची इच्छा व्यक्त केली. आंदोलनाला पोलिसांचे चांगले सहकार्य लाभले.
या वेळी सनातनच्या सौ. तन्वी सरमळकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. बळवंत पाठक यांनीही त्यांचे विचार मांडले. धर्माभिमानी सौ. नम्रता सावंत म्हणाल्या, आज हिंदूंना या देशात लक्ष्य केले जात आहे. हिंदूंनी संघटित होऊन धर्मावरील आघातांच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे.
जोगेश्वरी येथे १४ फेब्रुवारी २०१६ या दिवशी हिंदु धर्मजागृती सभा पार पडल्यावर येथील कृतीशील धर्माभिमानी सर्वश्री मिलिंद कदम, प्रदीप कदम, संतोष कदम, सचिन चव्हाण, संदेश धुरी, महेश दुमरालिया, सुनिल ठाकूर, सौ. संचिता ठाकूर, सौ. नम्रता सावंत यांनी विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह आंदोलनाची पूर्वसिद्धता आणि आंदोलन स्थळातील विविध सेवांत सक्रिय सहभाग घेतला. (कृतीशील हिंदुत्ववाद्यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात