Menu Close

राज्यकर्ते शिवछत्रपतींचा आदर्श अनुसरत नाहीत, हे देशाचे दुर्दैव !

पू. संदीप आळशी

‘जेम्स डगलस या ब्रिटीश यात्रेकरूने भारतभ्रमण केल्यानंतर ब्रिटनमध्ये परत गेल्यावर सांगितले, ‘मूठभर इंग्रज कोट्यवधी भारतियांवर राज्य करू शकले; कारण भारतीय छत्रपती शिवाजी महाराजांना विसरले !’ आज देशाचे राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारतात आणि त्यांची जयंती साजरी करतात; पण त्यांचा आदर्श अनुसरत नाहीत ! अन्यथा पाकने भारतभूमीवर आक्रमण केल्यानंतरही पाकमध्ये जीवितहानी होईल; म्हणून भारत पाकच्या भूमीवर आक्रमण न करण्याचे धोरण का अवलंबितो ? काश्मीरमध्ये भारतीय सैनिकांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांना जन्माची अद्दल घडेल अशी शिक्षा का केली जात नाही ? काश्मीरमधील लाखो हिंदू अजूनही विस्थापितांचे जीवन का जगत आहेत ? अजूनही आपल्या मायभूमीत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा का दिल्या जातात ?

एका ब्रिटीश यात्रेकरूला शिवछत्रपतींचे मूल्य समजले, ते भारतीय राज्यकर्त्यांना का समजत नाही ? हे असेच चालू राहिले, तर ‘देश पुन्हा पारतंत्र्यात जाईल’, हे सत्य दृष्टीआड करून चालणार नाही. हे होऊ द्यायचे नसेल, तर देशबांधवांनो, ‘हिंदु राष्ट्राच्या (आदर्श अशा रामराज्याच्या) स्थापनेला पर्याय नाही’, हे ओळखून त्यासाठी एकवटून प्रयत्न करूया !’

– (पू.) श्री. संदीप आळशी (११.२.२०१९)

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *