हिंदु राष्ट्र्र-जागृती सभेच्या माध्यमातून घाटकोपरमध्ये घुमला हिंदुत्वाचा आवाज !
मुंबई : पुलवामा येथे सैनिकांवर झालेल्या आक्रमणाच्या आधी आक्रमणकर्त्याने भारतियांना उद्देशून एक चलचित्र बनवले. त्यामध्ये त्याने बाबरी मशीद पाडल्याचा आणि भारतात मुसलमानांवर होत असलेल्या अत्याचाराचा सूड घेत असल्याचे सांगितले आहे. यापुढे अशी अनेक आक्रमणे आम्ही करणार असून ‘येथील गोमूत्र पिणार्यांना (हिंदूंना) संपवून आम्हाला इस्लामिक राष्ट्राची स्थापना करायची आहे’, असेही त्याने या वेळी सांगितलेे. यावरून हे आक्रमण वरकरणी केवळ देशावरील आक्रमण वाटत असले, तरी प्रत्यक्षात ते भारतात बहुसंख्य असलेल्या हिंदूंना संपवण्याच्या उद्देशानेच केले आहे. हिंदूंचे अस्तित्व संपवू पहाणार्या जिहादी आतंकवादाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आणि हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित होऊन कृतीप्रवण होण्याची वेळ आता आली आहे’, असे स्पष्ट प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी केले. घाटकोपर येथील आनंदनगरमधील उत्कर्ष मंडळाच्या सावरकर सभागृहात १६ फेब्रुवारीला पार पडलेल्या हिंदु राष्ट्र्र्र-जागृती सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेंद्रप्रसाद भोगले यांनी केले. १५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांनी या हिंदु राष्ट्र्र्र-जागृती सभेचा लाभ घेतला. सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी ‘लव्ह जिहाद’ची भयावहता आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन करून उपस्थितांना सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आणि सनातन प्रभातचे वर्गणीदार होण्याचे आवाहन केले. पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणात वीरमरण आलेल्या सैनिकांच्या आत्म्याला सद्गती मिळावी यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ११ वेळा करण्यात आला. सभेचा समारोप ‘सर्वेऽत्र सुखिन: सन्तु ।’ या श्लोकाने करण्यात आला.
श्री. कोचरेकर पुढे म्हणाले, ‘‘पोलिसांनी मुंब्रा येथून कह्यात घेतलेल्या आतंकवाद्यांचे आई-वडील जेव्हा त्यांच्या मुलांना भेटण्यासाठी कारागृहात येतात, तेव्हा ते मुलांना पोलिसांना काहीच माहिती न सांगण्याचा सल्ला देतात. यावरून जिहादी आतंकवाद किती खोल मुरला आहे, याची आपल्याला कल्पना करता येईल.’’
या सभेला शिवसेनेचे माजी नगरसेवक शिवभक्त संजयदादा भालेराव, शाखाप्रमुख श्री. अजय भोसले, माजी उपविभागप्रमुख श्री. गजानन भोसले, उपशाखाप्रमुख सर्वश्री जगदीश कदम आणि दीपक उतेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष श्री. सुनील सावंत आणि माजी सचिव श्री. विजय विचारे यांनी सभेसाठी सभागृह उपलब्ध करून दिले. शिवभक्त श्री. संजयदादा भालेराव यांनी सभेसाठी पटल आणि आसंद्या उपलब्ध करून दिल्या.
प्रतिसाद
१. सभेनंतर झालेल्या बैठकीला ४० हून अधिक धर्मनिष्ठांनी थांबून वक्त्यांकडून शंकानिरसन करवून घेतले. या वेळी उपस्थितांकडून धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी करण्यात आली.
२. माजी नगरसेवक शिवभक्त संजयदादा भालेराव यांनी प्रभावित होऊन येत्या शिवजयंतीला शिवसेना शाखेत सनातनच्या सर्व ग्रंथांचे प्रदर्शन मांडण्यास सांगितले.
३. शिवजयंतीनिमित्त क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन आणि व्याख्यान घेण्याची मागणी समितीच्या कार्यकर्त्यांना करण्यात आली.