हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या माध्यमातून माहीममध्ये हिंदूंचे संघटन !
मुंबई : देशात होणारी आतंकवादी आक्रमणे, तसेच धर्मावर विविध प्रकारच्या माध्यमांतून होणारे आघात रोखण्यासाठी ‘मी एकटा काय करणार ?’ असा विचार न करता हिंदूंनी आता संघटित होऊन क्रियाशील व्हावे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. बळवंत पाठक यांनी केले. येथील श्रीराम मंदिरात १७ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. हरेश मर्दे या वेळी उपस्थित होते. १०० हून अधिक राष्ट्रप्रेमी या सभेला उपस्थित होते.
श्री. बळवंत पाठक पुढे म्हणाले की, आपला धर्म हा अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा आहे. आज मात्र आपण धर्माकडे दुर्लक्ष करून अधोगतीला नेणार्या पाश्चात्त्य संस्कृतीच्या आहारी गेलो आहोत. आजच्या तरुणांना शिवजयंती कधी असते हे ठाऊक नाही; मात्र ‘व्हॅलेंन्टाईन डे’ यांचा बेत आठवडाभर आधीच ठरलेला असतो. हे रोखण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे.
प्रतिसाद
- धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
- अशाच प्रकारची सभा हिंदुत्वनिष्ठांच्या परिसरात घेण्याची मागणी केली.
- उपस्थित राष्ट्रप्रेमींनी सभेची पत्रके प्रायोजित केली आणि यापुढेही प्रायोजित करण्याची सिद्धता दर्शवली.
- आढावा बैठकीला अनेक तरुण उपस्थित होते. ‘आम्हीही या कार्यात साहाय्य करू’, असे त्यांनी सांगितले.