लंडन : गोमूत्राचे औषधी गुणधर्म लक्षात घेऊन लंडनच्या दक्षिण आशियायी दुकानांमध्ये खाद्यपदार्थांसोबत गोमूत्राचीही विक्री होत असल्याचे वृत्त बीबीसी या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले आहे.
एका दुकानविक्रेत्याने सांगितलेल्या माहितीनुसार, लंडनमधील हिंदू धार्मिक कारणासांठी तसेच घरामध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर गोमूत्राचा उपयोग करतात, असे लक्षात आले आहे. वेटफोर्ड येथील हरे कृष्णा मंदिराच्या डेअरीमध्ये गोमूत्राचे उत्पादन केले जाते. मंदिराचे व्यवस्थापक गौरी दास यांनी बीबीसीच्या प्रतिनिधीला माहिती देतांना सांगितले की, ७० च्या दशकापासून ते गोमूत्राचे उत्पादन करत आहेत. धार्मिक कार्यांसोबत औषध म्हणूनही गोमूत्राचा उपयोग केला जात आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात