प्रयागराज (कुंभनगरी) : देशाचे खरे शत्रू हे धर्मांध जिहादी असल्याने सद्यःस्थितीत पाकिस्तानसह जिहादींच्या रूपाने भारतात ‘अनेक पाकिस्तान’ निर्माण केलेल्या धर्मांध जिहाद्यांना सरकारने धडा शिकवला पाहिजे, असे परखड मत ‘सुदर्शन न्यूज’ या वृत्तवाहिनीचे अध्यक्ष, संचालक आणि मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी येथे व्यक्त केले. आपल्या पूर्वजांनी हिंदुस्थानचे केलेले विभाजन अपूर्ण असून ते आज पूर्ण करण्याची वेळ आली असल्याचेही ते म्हणाले.
‘पुलवामामधील आतंकवादी आक्रमण : जिहादचा अंत कधी होणार ?’, या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित आणि ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे प्रसारित कार्यक्रमातील चर्चेत ते बोलत होते. या वेळी चर्चेमध्ये त्यांच्या समवेत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, भारतीय सैन्याचे निवृत्त मेजर जनरल एस्.पी्. सिन्हा आणि सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक उपस्थित होते.
१. सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले की, भारतातील राजकीय स्थितीमुळे धर्मांध वाढले आहेत. जिहादी आतंकवादाचे मूळ पाकिस्तान आहे. पाकिस्तानला नष्ट करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. त्याचसमवेत अल्-कायदा, तालिबान, जैश-ए-महंमद यांना पाठिंबा देणारे आतंकवादी तळ पाकिस्तानमध्ये चालू आहेत, ते सरकारने त्वरित नष्ट केले पाहिजे. कठोर करवाईसाठी सरकारची इच्छाशक्ती अल्प पडत आहे.
२. जिहादी आतंकवादाने सर्व जगाला त्रासून सोडले आहे. आतंकवादी विचारांच्या लोकांनी या जगाला ‘दारुल हरब’ आणि ‘दारुल इस्लाम’ यांमध्ये विभाजित केले आहे. जेथे जेथे इस्लामचे राज्य नाही, तेथे ते इस्लामची सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी इसिस, जैश-ए-महंमद, अल्-कायदा आदी आतंकवादी गट सिद्ध होत आहेत.
३. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक म्हणाले की, देश स्वतंत्र झाल्यांनतर शत्रू राष्ट्र पाकिस्तानशी मैत्री करण्याची चूक आपण पुुन:पुन्हा करत आहोत. वर्ष २०१५ मध्ये २४४, वर्ष २०१७ मध्ये १२२, तर वर्ष २०१८ मध्ये ८२ सैनिक मारले गेले आहेत. ही स्थिती पालटणारे राज्यकर्ते पाहिजे, अशी अपेक्षा ठेवतो. यासाठी जनतेने संघटितपणे दबाव निर्माण केला पाहिजे.
४. भारतीय सैन्याचे निवृत्त मेजर जनरल एस्.पी्. सिन्हा म्हणाले की, पुलवामा येथील आतंकवादी आक्रमण हे देशातील २६/११ नंतरचे सर्वांत मोठे आतंकवादी आक्रमण आहे. देशाला बाहेरील आणि आतील शत्रूंपासून धोका आहे. पाकिस्तानने लढाईच्या धोरणात पालट केला आहे. पाकिस्तान पूर्वी भारताशी लढला; मात्र हारला, त्यानंतर नियंत्रण रेषेच्या आता जेवढ्या प्रमाणात पाकिस्तान्यांना घूसवू पहात आहेे, तेथेही त्याला अपयश येत आहे. त्यामुळे आता पाकिस्तान काश्मीरच्या स्थानिक लोकांना आपल्या प्रभावाखाली आणून त्यांना आतंकवादी बनवून असे काम करत आहे. काश्मीर खोर्यात तिरंगा जाळला जातो, पाकिस्तानच्या बाजूने घोषणा दिल्या जात आहेत; परंतु त्यांच्यावर कारवाई होत नाही. राष्ट्रद्रोह करणार्यांवर त्वरित कारवाई होऊन जलदगती न्यायालयात त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्यांना देशातून बाहेर काढले पाहिजे. ज्यांना लाठीची भाषा समजते, त्यांना तसेच सांगावे लागेल. मानवाधिकारवाले मानवाधिकाराची भाषा करतात; मात्र मानवाधिकार हा देशापेक्षा मोठा नाही, असे. सिन्हा यांनी ठणकावून सांगितले.