हिंदूंचा एैतिहासिक आणि गौरवशाली ठेवा जपायचा सोडून त्याचा विध्वंस करणारे असे जन्महिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी आहेत !
हंपी (कर्नाटक) : येथील प्राचीन आणि ‘युनेस्को’ने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या विष्णु मंदिरात ४ तरुणांनी तोडफोड केली होती. न्यायालयाने त्यांना पाडलेले खांब पुन्हा उभे करण्याची, तसेच प्रत्येकी ७० सहस्र रुपयांचा दंड भरण्याची शिक्षा ठोठावली. मध्यप्रदेशातील आयुष, बिहारचे राजा बाबू चौधरी, राज आर्यन आणि राजेश कुमार अशी त्यांची नावे आहेत. शिक्षा सुनावल्यानंतर या चौघांना मंदिराच्या खांबांची तोडफोड केली होती, त्या ठिकाणी नेण्यात आले. तेथे त्यांना पाडलेले खांब उभे करण्याची शिक्षा पूर्ण करण्यास सांगण्यात आले. तसेच त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. या वेळी पुरातत्व खात्याचे अधिकारी आणि पोलीस उपस्थित होते. यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
सनी पुत्तर, तेरा दिमाग़ ख़राब हो गया है क्या?