Menu Close

राजस्थानात मानवी देहाचा व्यापार ; सूत्रधार शहजादीबी शेख कासीम अटकेत

नांदेड : जिल्ह्यातील मानवी देहाचा व्यापार प्रकरणाची व्याप्ती वाढतच चालली आहे. सोमवारी या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी उमरी येथील उषाबाई जाधव या महिलेला अटक केली. अटक झालेली ती नववी आरोपी आहे. या प्रकरणाची सूत्रधार शहजादीबी शेख कासीम या महिलेला शनिवारीच पोलिसांनी अटक केली.
या प्रकरणाचा तपास करणारे सहायक पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. समाजातील दलित, आदिवासी, दारिद्र्यात खितपत पडलेल्या कुटुंबांना हेरून त्यांना पैशाचे आमिष दाखवायचे. त्यांच्या मुलीची परप्रांतात विक्री करून पैसे कमवायचे असा धंदा आहे. दैवशालावर झालेल्या बलात्कारामुळे हे सर्व प्रकरण उघडकीला आले. आतापर्यंत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील जवळपास आठ मुलींना परप्रांतात विकण्यात आले. परंतु केवळ माहितीवर आमचा विश्वास नाही. त्यामुळे आमची एक टीम राजस्थानात पाठवली आहे.
ज्या मुलींची नावे मिळालीत, त्या मुली नेमक्या कोठे आहेत, याचा ठावठिकाणा शोधला जात आहे. आतापर्यत तीन मुलींचा ठावठिकाणा सापडला असून त्यांचे जबाबही पोलिसांनी घेतले आहेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *