हिंदु जनजागृती समितीची उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्यांकडे मागणी
पणजी : पुलवामा (काश्मीर) येथे १४ फेब्रुवारीला केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांवर झालेल्या आतंकवादी आक्रमणात ४२ पोलीस हुतात्मा झाले. या आक्रमणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. देश संकटात असतांना अमली पदार्थांच्या मुक्त सेवनाची पार्श्वभूमी लाभलेला आणि महसूलबुडव्या ‘ईडीएम्’ महोत्सवाला दिलेली मान्यता शासनाने रहित करावी. गोवा ‘ईडीएम्’ मुक्त करावे. ‘सनबर्न’ने बुडवलेला कर सव्याज त्वरित वसूल करावा आणि राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’ आयोजकांवर ध्वजसंहितेनुसार गुन्हा नोंदवावा, अशा मागण्या हिंदु जनजागृती समितीने उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्यांकडे २१ फेब्रुवारी या दिवशी एका निवेदनाद्वारे केली.
या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये समितीचे दक्षिण गोवा समन्वयक सर्वश्री सत्यविजय नाईक, गोपाळ बंदीवाड आणि देविदास गावकर यांची उपस्थिती होती.