Menu Close

नाशिकमध्ये कीर्तनाच्या नावाखाली ख्रिस्त्यांकडून धर्मपरिवर्तनाचा कट !

  • ख्रिस्त्यांच्या नवनवीन क्लृप्त्या चालूच !
  • हिंदूंनो, हिंदु परंपरेतील विविध गोष्टींचा वापर करून ख्रिस्ती पंथाचा प्रसार करण्याचे आणि त्या माध्यमातून फसवून तुमचे धर्मांतर करण्याचे धूर्त ख्रिस्त्यांचे षड्यंत्र जाणा !

नाशिक : येथे काही दिवसांपूर्वी ‘चर्च ऑफ दि नॅझरीन’च्या सहयोगाने तथाकथित महाराज जॉन रायबोले यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला ‘जॉन रायबोले यांचे भव्य कीर्तन’ असे नामकरण करण्यात आले होते. शहरामध्ये या कार्यक्रमाचे मोठे फलक लावण्यात आले होते. ‘जो कोणी प्रभु येशूचे नाव घेऊन त्याचा ‘दहावा’ करील, त्याचे तारण होईल’, अशा आशयचा मजकूर फलकावर लावण्यात आला होता. (मृत्यूनंतर दहाव्या दिवशी केला जाणारा विधी, हा हिंदु धर्म संस्कृतीचा भाग आहे. ख्रिस्ती कधीपासून हा विधी करायला लागले ? हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी या शोधून काढलेल्या नवनवीन क्लुप्त्या आहेत, हे ओळखायला हिंदू दूधखुळे नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या फलकावर ख्रिस्ती व्यक्तीने कीर्तनकाराप्रमाणे पोषाख करून तो कीर्तन करत असल्याचे दाखवण्यात आले होते.

‘महाराज’, ‘कीर्तन’ या शब्दांच्या वापरामुळे हिंदु संस्कृतीचा आधार घेऊन धर्मांतराचा घाट घातला जात असल्याची शंका काही हिंदुत्वनिष्ठांनी या कार्यक्रमाच्या संदर्भात उपस्थित केली आहे. नाशिक येथे ख्रिस्त्यांकडून हिंदूंचे धर्मांतर करण्याचे प्रस्थ वाढत असल्याने हिंदूंनी सावध राहून वैध मार्गाने हे षड्यंत्र उघड करावे, असेही हिंदुत्वनिष्ठांनी सांगितले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *