या घटनांविषयी भारतातील एकही पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, भारतीय प्रसारमाध्यमे आणि सर्वधर्मसमभावाचे डबडे वाजणारे काहीच बोलत नाही, हे लक्षात घ्या !
व्हॅटिकन सिटी : लोकांना वाटत आहे की, कॅथलिक चर्चमध्ये होणार्या मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. ईश्राचे पवित्र भक्त अशा घटनांची केवळ निंदा करण्याची अपेक्षा ठेवत नाहीत, तर ठोस आणि प्रभावी पाऊल उचलण्याची वाटत पहात आहेत. त्यासाठी आपण त्या मुलांचे ऐकू, जे न्यायाची मागणी करत आहेत, असे प्रतिपादन ख्रिस्त्यांचे ८२ वर्षीय सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी येथे केले. (गेली अनेक वर्षे पाद्य्रांकडून लहान मुले, महिला आणि नन यांचे लैंगिक शोषण केले जात आहे; मात्र ते रोखण्यासाठी व्हॅटिकन सिटीने कोणतेही ठोस उपाय केलेले नाहीत आणि आताही ते करत नसल्याने पोप यांना असे विधान करावे लागत आहे, हे स्पष्ट होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पोप फ्रान्सिस यांनी मुलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकार रोखण्यासाठी व्हॅटिकनमध्ये एका संमेलनाचे आयोजन केले आहे. त्याच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. या संमेलनामध्ये ११४ बिशप सहभागी झाले आहेत. यांना याविषयी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. (ज्यांची साधना योग्य दिशेने चालू असते, ते अशा प्रकारची कृत्ये करत नाहीत. तसेच कोणाची साधना चांगली चालू आहे आणि कोण पापकर्मे करत आहेत, हे आध्यात्मिक उन्नत असणार्यांच्या लक्षात येते; मात्र व्हॅटिकनकडे असे कोणी नसल्यामुळेच अशा घटना पाद्य्रांकडून होत आहेत, असेच लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात