Menu Close

पाकच्या पंजाब प्रांतातील ‘जैश-ए-महंमद’चे मुख्यालय पाक सरकारच्या नियंत्रणात

  • अशा कारवाईतून पाक ‘आम्ही काहीतरी करत आहोत’ असेच दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, हे न समजायला जग दूधखुळे नाही !
  • पाकला खरेच आतंकवाद्यांच्या विरोधात काही करायचे असेल, तर त्याने प्रथम आतंकवाद्यांची निर्मिती बंद करून सर्व आतंकवाद्यांना फाशी देण्याचे धाडस दाखवावे !

इस्लामाबाद : पाकच्या पंजाब प्रांतातील बहावलपूरमधील ‘मदरसातूल साबिर’ आणि ‘जामा-ए-मशीद सुभानल्ला’ हे जैश-ए-महंमदचे मुख्यालय पाकिस्तान सरकारने नियंत्रणात घेतले आहे. ही माहिती पंजाब सरकारच्या प्रवक्त्याने दिली आहे. या मुख्यालयात मदरसा असून त्यात ७० शिक्षक आणि ६०० विद्यार्थी आहेत. (हा मदरसा म्हणजेच आतंकवाद्यांच्या निर्मितीचा कारखाना आहे, हे लक्षात घ्या ! पाकने हा कारखाना बंद करणे अपेक्षित आहे; मात्र तो त्याला नियंत्रणात घेऊन त्याचे संरक्षणच करत आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) सध्या पंजाब प्रांताचे पोलीस मुख्यालयाच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. मौलाना मसूद अझहर हादेखील याच मुख्यालयात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकमधील प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार जैशच्या मुख्यालयाशी संबंधित असलेली प्रकरणे हाताळण्यासाठी पाक सरकारने एका प्रशासकाची नियुक्ती केली आहे.

मुख्यालयात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना नेण्यात येणार

या कार्यालयात काय चालते, हे दाखवण्यासाठी पाकने प्रसारमाध्यमांना तेथे नेण्याचे ठरवले आहे. यातून या मुख्यालयातून आतंकवादी कारवाया केल्या जात नाहीत, हे दाखवण्याचा प्रयत्न पाककडून केला जाणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

0 Comments

  1. Mulchan Rampersad

    This is an example of other religions taking advantage of the Hindus over the thousand of years. India belong to Hindus and should never tolerate this, Prime Minister Modi should wake up and pass legislation to stop this behavior immediately.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *