Menu Close

विश्‍वाची उत्पत्ती भगवान शिवाच्या तांडवनृत्यातून झाली असावी : स्वित्झर्लंड येथील प्रयोगशाळेचे अनुमान

  • हिंदूंनो, पाश्‍चात्त्यांचा उदोउदो न करता आपल्या महान परंपरेचा सदैव अभिमान बाळगा !
  • भारतीय शास्त्रज्ञ कधी असे संशोधन करतात का ?
  • हिंदूंच्या देवतांवर टीका करणारे आता बोलतील का ?

सर्न (स्वित्झर्लंड) : विश्‍वाची उत्पत्ती भगवान शिवाच्या तांडवनृत्यातून झाली असावी, असे स्वित्झर्लंड येथील एका प्रयोगशाळेने अनुमान वर्तवले असून या दिशेने त्यांचा अभ्यास चालू आहे.

येथील शास्त्रज्ञ फ्रिजोफ काप्रा यांनी या गोष्टीवर प्रकाश टाकतांना सांगितले की,

१. विश्‍वाच्या उत्पत्तीच्या आधुनिक भौतिकशास्त्राच्या संकल्पना आणि प्राचीन हिंदु तत्त्वज्ञानाच्या संकल्पना यांमध्ये पुष्कळ साम्य आहेे. तसेच प्राचीन हिंदु तत्त्वज्ञानाच्या या संकल्पना आधुनिक विज्ञानासाठी दिशादर्शक ठरत आहेत. (प्राचीन हिंदु तत्त्वज्ञान परिपूर्ण असल्याने पाश्‍चात्त्य शास्त्रज्ञ त्याचा जिज्ञासेने अभ्यास करतात. भारतातील तथाकथित स्वाभिमानशून्य बुद्धीवादी मात्र त्यावर उपहासात्मक टीका करून दिव्याखाली अंधार ही म्हण सार्थ ठरवतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. भगवान शिवाचे तांडव नृत्य हे अतिवेगवान नृत्य आहे. या नृत्यातून विश्‍वाची उत्पत्ती आणि नाश होतो आणि त्या नाशातच नव्या विश्‍वनिर्मितीची बीजेही असतात.

३. उत्पत्ती आणि नाश यांच्या मधला काळ म्हणजे स्थिती किंवा आयुष्य असते. अशी ही धार्मिक संकल्पना आहे.

४. वैज्ञानिक संकल्पानाही साधारणतः अशीच आहे. अणू ज्या कणांपासून बनतो अशा सूक्ष्मातिसूक्ष्म कणांच्या ऊर्जानृत्यातूनच विश्‍वनिर्मिती झालेली आहे. यांनाच देवकण असे संबोधण्यात आलेले असून त्यांचा शोध घेण्याचे कार्य सध्या चालू आहे.

५. या प्रयोगशाळेत संशोधनाचे प्रेरणास्थान म्हणून तांडव नृत्य करणार्‍या शिवाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. ही मूर्ती २ मीटर उंचीची असून ती विश्‍वाचा जन्म, त्याची धारणा आणि शेवट यांचे प्रतीक असल्याचे काप्रा यांनी म्हटले आहे.

६. प्रयोगशाळेतील अन्य शास्त्रज्ञांनीही काप्रा यांच्या या मताविषयी सहमत असल्याचे म्हटले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *