हिंदूंकडून आस्थापनाचा विरोध करून क्षमा मागण्याची मागणी
विदेशात सातत्याने आणि जाणीवपूर्वक मद्य, शौचालयांचे भांडे, पादत्राणे आदींवर हिंदूंच्या देवतांची नावे आणि चित्रे ठेवून त्यांचा अवमान केला जात आहे. अशांवर कठोर कारवाई होण्यासाठी भाजप सरकारने स्वतःहून प्रयत्न करायला हवेत ! हिंदु राष्ट्रातील भारत सरकारचा इतका वचक असेल की, हिंदूंच्या देवतांचे विडंबन करण्याचे धारिष्ट्य जगात कोणीही करणार नाही !
नेवाडा (अमेरिका) : अमेरिकेतील व्हर्जिनिया प्रांतात असलेल्या सलेम या शहरात ‘ओल्डे ब्रिविंग’ या बिअर आणि इतर मद्ये यांची निर्मिती करणार्या आस्थापनाने तिच्या एका बिअर उत्पादनाचे नाव ‘हनुमान’ असे ठेवले आहे. यामुळे हिंदूंकडून त्यांचा विरोध केला जात आहे. हिंदूंनी या आस्थापनाला संपर्क करून ‘श्री हनुमानाच्या नावाचा उल्लेख एका मद्यनिर्मितीसाठी करणे, हे अयोग्य असून त्यामुळे जगातील सर्व हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत’, असे कळवले असून हे नाव त्वरित काढून टाकावे आणि जाहीर क्षमा मागावी, असे आवाहन केले आहे. अमेरिकेत ३० लाख हिंदू रहातात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात