Menu Close

पाद्य्रांकडून झालेले लहान मुलांचे लैंगिक शोषण नरबळीसारखे : पोप फ्रान्सिस

चर्चमध्ये पाद्य्रांकडून मुले, नन्स आणि महिला यांच्या लैंगिक शोषणाच्या जगभरात असंख्य घटना घडल्या आहेत अन् घडत आहेत; मात्र भारतातील ख्रिस्तीप्रेमी आणि ख्रिस्ती मालक असलेली तथाकथित निधर्मीवादी प्रसारमाध्यमे यावर मौन बाळगतात अन् कथित आरोपांवरून हिंदूंच्या संतांविषयी अश्‍लाघ्य भाषेत लिखाण करून त्यांची वारंवार नाहक अपकीर्ती करतात, हे लक्षात घ्या !

व्हॅटिकन सिटी : मुलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकार सर्व संस्कृती आणि समाज यांमध्ये राहिली आहे. (सर्व संस्कृती म्हणजे कुठली संस्कृती हे पोप यांनी प्रथम स्पष्ट करावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) मला नरबळीसारखी क्रूर धार्मिक परंपरा ठाऊक आहे, जी काही संस्कृतींमध्ये पसरली होती. विशेषतः गैर ख्रिस्त्यांमध्ये आहे. लैंगिक शोषणाचा प्रकारही तसाच आहे. जे पाद्री मुलांचे लैंगिक शोषण करतात, ते सैतानाचे रूप आहेत. यावर लक्ष देणे आपले दायित्व आहे, असे आवाहन ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी येथे केले. (असे प्रकार घडू नयेत, यासाठी पोप फ्रान्सिस यांनी त्यांचे दायित्व किती पार पाडले, हे त्यांनी सांगायला हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) जगभरातील बिशप आणि पाद्री यांच्यासाठी ४ दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या समारोपाच्या वेळी ते बोलत होते. ही परिषद मुले, नन आणि महिला यांच्यावर पाद्य्रांकडून होणार्‍या लैंगिक शोषणावर आळा घालण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या उद्घाटनाच्या वेळी पोप यांनी ‘पीडित मुले न्यायाची मागणी करत आहेत’, असे म्हटले होते.

लैंगिक शोषणाच्या माहितीच्या धारिका (फाईल्स) नष्ट करण्यात आल्या ! – जर्मन कार्डिनलची स्वीकृती

  • या परिषदेमध्ये जर्मनीचे कार्डिनल रीनहार्ड मार्क्स यांनी सांगितले की, पाद्य्रांकडून लहान मुलांच्या झालेल्या लैंगिक शोषणाची आणि ते करणार्‍या गुन्हेगारांची संपूर्ण माहिती असणार्‍या धारिका नष्ट करण्यात आल्या, तसेच काही धारिका बनवण्यातच आल्या नाही. (यावरून राजकारणी भ्रष्टाचाराविषयी जसे एकमेकांना मिळालेले असतात, तसाच प्रकार ख्रिस्ती पाद्य्रांमध्ये आहे, हे लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
  • कार्डिनल मार्क्स यांच्या विधानावर ‘इंटरनॅशनल असोसिएशन एंडिंग क्लेरिकल अब्यूज’ या संस्थेने प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, चर्चकडून अशा प्रकारचे गंभीर कृत्य घडले आहे. याची चौकशी झाली पाहिजे. (या संस्थेने केलेल्या मागणीनुसार पोप फ्रान्सिस हे याची चौकशी करतील का आणि स्वतःचे दायित्व निभावतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
  •  चर्चमध्ये होणार्‍या लैंगिक शोषणाची माहिती व्हॅटिकनला आहे. यापूर्वी व्हॅटिकनने या संदर्भातील कागदपत्रे सार्वजनिक करण्यास नकार दिला आहे.

खरे दोषीच लैंगिक शोषणावर कायदा बनवत आहेत ! – पीडित महिलेचा आरोप

पाद्य्रांकडून झालेल्या लैंगिक शोषणातील पीडित २ महिलाही या परिषदेमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांनी या परिषदेच्या आयोजनावरच शंका उपस्थित केली. एका पीडितेने सांगितले की, या परिषदेमध्ये लैंगिक शोषणाच्या घटना रोखण्यावर चर्चा होत आहे. अनेक दशकांपासून अशा घटना चालू ठेवणारेच आज या विरोधात कायदा करणार आहेत. कायदा बनवणार्‍यांमध्ये महिला, सामाजिक कार्यकर्ते, लैंगिक शोषण पीडित आणि अशा पीडितांना साहाय्य करणारे तज्ञ यांचा मात्र यात कुठेच सहभाग दिसत नाही. (पोप फ्रान्सिस या प्रश्‍नाचे उत्तर देतील का ? पीडित महिलेच्या या प्रश्‍नावरून ही परिषद केवळ ढोंग होते, हे लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *