यवतमाळ येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनातील राष्ट्रप्रेमींची मागणी !
यवतमाळ : गेल्या काही वर्षांत देशभरात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणे, त्यांना वेचून किंवा त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना ठार मारणे अशा घटना सातत्याने घडत आहेत. नुकतेच कर्नाटक आणि मध्य प्रदेश येथे सत्तांतर झाल्यानंतर हिंदु नेत्यांच्या हत्या, त्यांच्यावरील आक्रमणे यांतही लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य प्रदेशमध्ये गेल्या ४ मासांत चार हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या झाल्या. तमिळनाडूमध्ये रामलिंगम या हिंदु व्यापार्याची हत्या धर्मांतराला विरोध केल्याच्या कारणावरून झाली. मध्य प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू यांसह देशभरातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्यांचे षड्यंत्र रचणारे सूत्रधार, तसेच ही प्रकरणे दडपण्यासाठी प्रयत्न करणारे अधिकारी या सर्वांवर कठोर कारवाई व्हावी, या प्रकरणाची चौकशी करण्यास संबंधित राज्य सरकार अपयशी ठरत असल्याने या घटनांचा तपास केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे द्यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश खांदेल यांनी केली. ते दत्त चौक येथे २४ फेब्रुवारीला झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात बोलत होते. आंदोलनाला दीडशेहून अधिक जिज्ञासूंनी स्वाक्षरीद्वारे पाठिंबा दर्शवला.
जमशेदपूर येथे धर्मांधांच्या धमक्यांमुळे विस्थापित झालेल्या ४०० हिंदूंचे पुनर्वसन करून त्यांना सुरक्षा पुरवावी. पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बेशिस्त बांधकाम करून मंदिराच्या पुरातन वास्तूला धोका निर्माण करणारे आणि शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचा प्रसाद करण्यासाठी बनावट आस्थापनाला कंत्राट देणारे यांच्यावरही कठोर कारवाई करावी, अशी मागणीही या आंदोलनामध्ये करण्यात आली. या मागण्यांचे निवेदन शासनाला पाठवण्यात येणार आहे.
क्षणचित्रे
१. गोपनीय शाखेच्या पोलीस अधिकार्यांनी आंदोलनाचे चित्रीकरण केले.
२. चार धर्मांधांनी आंदोलनाची पाहणी केली. त्यातील एकाने आंदोलनातील फलकावरील माहिती वाचून ‘चालू द्या’, असे पुटपुटत निघून गेला.
३. आंदोलनामध्ये बालसाधक सहभागी झाले.
४. पुष्कळ ऊन असूनही धर्मशिक्षणवर्गातील महिला आंदोलनात सहभागी झाल्या.