हिंदु राष्ट्र-जागृती सभेतून कृतीशील होणार्या धर्मप्रेमींचा सर्वांनीच आदर्श घ्यावा !
तुरमाळे (पनवेल) : येथील कै. अनंत गायकर यांच्या अंगणात मरूआई मंदिराजवळ हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. सभेला ९० धर्माभिमानी उपस्थित होते. समितीचे श्री. योगेश ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुलवामा येथे हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहून सभेला प्रारंभ करण्यात आला. या सभेला सह्याद्री प्रतिष्ठानचे पनवेल तालुक्याचे अध्यक्ष श्री. सतिश हातमोडे उपस्थित होते. सभेनंतर १५ तरुण आढावा बैठकीसाठी थांबले होते. त्यांनी गावातील मैदानात मोठ्या सभेच्या आयोजनाचे दायित्वही घेतले. सभेच्या नियोजनासाठी ३ मार्चला बैठक, तर १० मार्चला मोठी सभा घेण्याचेही ठरले.
वाढत्या चर्चना विरोध करण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या भूमीत मावळे व्हायला हवे ! – योगेश ठाकूर
पनवेल शहरात २ टक्के ख्रिस्ती असतांना येथे १६ मोेठी चर्च उभी राहिली आहेत. कशासाठी ? तर हिंदूंच्या धर्मांतरासाठी ! आपण संंघटित होऊन याला विरोध करायला हवा. छत्रपती शिवरायांच्या भूमीत आपण त्यांचे मावळेच व्हायला हवे. लव्ह जिहाद, देवतांचे विडंबन या सर्व समस्यांवर हिंदु राष्ट्राची स्थापना हा एकच उपाय आहे.
सहकार्य
१. मरूआई महिला मंडळातील महिलांनी सभेचा प्रसार घरोघरी जाऊन केला.
२. मरूआई मित्रमंडळाने सभेच्या ध्वनी आणि विद्युत व्यवस्थेसाठी सहकार्य केले.
३. कै. अनंता गायकर यांचे अंगण सभेसाठी उपलब्ध करून देण्यात आले.
४. प्रखर धर्माभिमानी श्री. बाळाराम पाटील यांनी पुढाकार घेऊन सभेला सहकार्य केेले.
५. तुरमाळे गावचे सरपंच श्री. दत्तात्रय हातमोडे हेही सभेला उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण
१. घरोघरी जाऊन प्रसार करणार्या महिला सांगत होत्या, ‘‘आता आपल्याला झाशीची राणी व्हायचे आहे आणि धर्माचे रक्षण करायचे आहे.’’
२. सभा संपल्यानंतरही अनेकजण थांबून होते. तेथून निघण्याची कोणाला इच्छाच होत नव्हती.
३. मनिष डिस्ट्रिब्युटरचे श्री. शरद वांगीलकर, तसेच तुरमाळे ग्रामस्थ आणि शिवप्रेमी तरुण यांचे सहकार्य लाभले.