Menu Close

अमरावती येथे हिंदूंच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदु आंदोलन

अमरावती : जमशेदपूर येथील हिंदू त्यांना देण्यात आलेल्या धमक्यांमुळे विस्थापित झाले. आपण भारतामध्ये ‘हिंदु’ म्हणून एक झालो नाही, तर जमशेदपूरसारखी स्थिती आपल्यावरही येऊ शकते. ती वेळ येऊ नये, यासाठी लवकरात लवकर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करायला हवेत. आतंकवाद, लव्ह जिहाद, गोहत्या यांसारखी विविध प्रकारची आक्रमणे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यांना वेळीच आळा घालायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष श्री. मुकुल कापसे यांनी केले. येथील राजकमल चौकात घेतलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. या आंदोलनाचा लाभ ‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून ९ सहस्र ५०० हून अधिक हिंदूंनी घेतला.

आपल्याच देशात आंदोलने करावी लागणे ही राष्ट्राची शोकांतिका ! – नितीन व्यास, प्रदेशाध्यक्ष, भगवा सेना

आपल्यावर आक्रमणे करणार्‍यांवर आक्रमणे करा, या मागणीसाठी आपल्याच देशात आम्हाला आंदोलने करावी लागत आहेत, ही राष्ट्राची शोकांतिका आहे. सातत्याने आतंकवादी कारवाया करणार्‍या पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून कायमचे नष्ट करा, अन्यथा आम्हा हिंदूंंना रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात यासाठी आंदोलने करावी लागतील, हे सरकारने लक्षात घ्यावे.

योग वेदांत सेवा समितीचे सचिव श्री. मानव बुद्धदेव, सनातन संस्थेच्या सौ. विभा चौधरी, हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर आणि सौ. अनुभूती टवलारे यांनीही आंदोलनात आपापली मते व्यक्त केली.

उपस्थित हिंदुत्वनिष्ठ : राष्ट्रीय बजरंग दलाचे श्री. अमित चव्हाण, श्री. विशाल चव्हाण, श्री. शैलेश गवळे, श्रीराम सेनेचे श्री. प्रमेंद्र शर्मा, श्री. जुगलकिशोर ओझा, श्री. मोहित दीक्षित, समितीच्या धर्मशिक्षणवर्गात येणारे धर्मप्रेमी सर्वश्री विमल पांडे, विलास पानसे, गौरव ढेरे, रवी हसवानी, विनोद जावरकर, सौ. मनीषा मरोडकर, सौ. कल्पना सदार यांसह सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

क्षणचित्र : तीन नवीन धर्मप्रेमी आंदोलन पाहून प्रथमच आंदोलनात सहभागी झाले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *