Menu Close

नौपाडा (ठाणे) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

निधर्मी भारतात जर सर्व धर्मियांचा विकास होत असेल, तर मग केवळ हिंदूंच्याच मंदिरांचा पैसा का वापरला जातो ? – वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे, हिंदु जनजागृती समिती

सभेला संबोधित करतांना वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे

ठाणे : भारताच्या सीमेवर प्रत्यक्ष युद्ध चालू झाले असले, तरी भारताच्या अंतर्गत अनेक ठिकाणी  लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद यांच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे युद्ध चालूच आहे. त्यामुळे भारतात छोटे पाकिस्तान निर्माण होत आहेत. निधर्मी भारतात विकास सर्व धर्मियांचा होत असेल, तर मग विकासाच्या नावाखाली केवळ हिंदूंच्याच मंदिरांचा पैसा का वापरला जात आहे ? मशिदींमधून आतंकवाद पोसला जातो, लव्ह जिहादसाठी पैसे दिले जातात. ख्रिस्त्यांकडून धर्मांतरासाठी मोठ्या प्रमाणात पैसे वापरला जातो. त्यांचा पैसा विकासासाठी का वापरला जात नाही ? हिंदु राष्ट्रात सर्वांना नियम सारखेच असतील आणि ज्यांना हे नियम मान्य नसतील, त्यांनी त्यांना जो देश आवडतो, त्या देशात निघून जावे, असे मागर्दशन हिंदु जनजागृती समितीच्या वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे यांनी केले. साठेवाडी, नौपाडा येथे २४ फेब्रुवारीला झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत त्या बोलत होत्या.

हिंदु धर्म नष्ट होत असल्याचे दाखवणारी ठाणे येथील उदाहरणे

  • नौपाडा येथील भास्कर कॉलनीमधील दोन ब्राह्मण मुली ‘लव्ह जिहाद’मध्ये फसल्या गेल्या आहेत.
  • रघुनाथनगर येथील हनुमाननगर हा भाग मुसलमानबहुल झाल्याने तो आता ‘हाजुरी’ या नावाने ओळखला जात आहे.
  • सेंट जॉन शाळेमध्ये स्वतःच्या मुलाला प्रवेश देण्याच्या नावाखाली एका गरीब महिलेचे धर्मांतर करण्यात आले.

धर्मांतराच्या विरोधाला बळी न पडता त्यांना धैर्याने वेळीच ठणकावणार्‍या ठाणे येथील सनातन प्रभातच्या महिला वाचक !

पतीच्या निधनानंतर सनातन प्रभातच्या एका महिला वाचकांच्या घरी येऊन एका महिलेने सांगितले, ‘‘तुम्ही आमच्याकडे या. आम्ही मनःशांतीसाठी प्रार्थना करतो.’’ महिला वाचक संबंधित ठिकाणी गेल्यावर त्यांना तेथे धर्मांतराचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असतांना तेथील अन्य महिलांनी शिव्या आणि अरेरावीची भाषा वापरत बळजोरीने त्यांना बसवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महिला वाचकांनी धीटपणे सांगितले, ‘‘आमचा मानसिक ताण दूर करण्यासाठी आमचे देव सक्षम आहेत.’’

क्षणचित्रे

  • माजी नगरसेवक श्री. भास्कर पाटील यांनी आसंद्या, खुर्च्या, पटल, विद्युतयंत्रणा विनामूल्य उपलब्ध करून दिली.
  • अभिनव कट्ट्याचे श्री. भारत नाकती यांनी ध्वनीक्षेपक यंत्रणा विनामूल्य दिली.
  • काही आजी-आजोबाही सभेला उपस्थित होते.
  • एका धर्मप्रेमीने कौतुक केले की, सभा चांगली आणि शिस्तबद्ध वाटत आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *