हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत सनातनचे साधक स्वस्थ बसणार नाहीत ! – सौ. नयना भगत
खारघर (नवी मुंबई) : सनातन संस्थेने तथाकथित विचारवंतांचे पितळ उघडे पाडल्याने आणि त्यांच्या हिंदु धर्म विरोधी अपप्रचाराला चोख वैचारिक प्रत्युत्तर दिल्यानेच संस्थेला लक्ष्य बनवण्यात आले आहे. यातूनच त्यांच्या हत्यांमध्ये संस्थेचे नाव गोवून संस्थेचे भव्य कार्य आणि पर्यायाने हिंदु धर्माची हानी करण्याचे षड्यंत्र काही राजकीय पक्ष, धर्मांध संघटना, नेते आणि मिडियातील विशिष्ट वर्गाचे आहे; मात्र संस्थेचे कार्य संत आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेने पुढेही सुरूच रहाणार आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत सनातनचे साधक स्वस्थ बसणार नाहीत, असा निश्चय सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी येथे केला. त्या शिव मंदिर देवस्थान, सेक्टर ११, खारघर येथे २४ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या हिंंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होत्या.
या सभेला ज्येष्ठ शिवसैनिक श्री. गिरीश गुप्ता यांच्यासह १५० राष्ट्र आणि धर्म प्रेमी उपस्थित होते. सभेसाठी शिव मंदिर देवस्थानचे सचिव, तसेच ज्येष्ठ शिवसैनिक श्री. आत्माराम पाटील, देवांग डेकोरेटर्स आणि भारती डेकोरेटर्स यांनी विशेष साहाय्य केले.
अखंड भारतासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एक पर्याय ! – डॉ. उदय धुरी, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
यापुढे भारताचे अखंडत्व आणि स्वातंत्र्य टिकवायचे असेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना अन् धर्माचरण हाच एकमेव पर्याय आहे.
सभेनंतर अनेकांनी धर्मशिक्षण वर्ग चालू करण्याची मागणी केली. धर्माचरणाचे महत्त्व अन्यांना सांगणार असल्याचेही अनेकांनी सांगितले. ‘आसपासचे मित्र आणि रहिवासी यांना समितीच्या कार्यात जोडण्याचा प्रयत्न करू’, असेही काहींनी कळवले.
क्षणचित्रे
१. पुलवामा येथील वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली म्हणून ११ वेळा ‘श्री गुरुदेव दत्त’ असा सामूहिक नामजप उपस्थितांनी केला.
२. डॉ. वैभव भदाणे यांनी बैठकीत हिंदु संस्कृती आणि राष्ट्रीय प्रतीके यांना विरोध करणार्या एका शाळेविषयी आलेले कटू अनुभव मांडले.
मुंबई सेंट्रल येथेही हिंदु राष्ट्राविषयीचे प्रवचन !
२४ फेब्रुवारी या दिवशी मुंबई सेंट्रल येथेही हिंदु राष्ट्राविषयीचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी उपस्थितांना संबोधित करून राष्ट्र्र आणि धर्म यांवरील आघात, त्यावरील उपाय आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता यांविषयी मार्गदर्शन केले.