प्रयागराज (कुंभनगरी) : आम्ही देशाचे रक्षण करतो तुम्ही धर्माचे रक्षण करत आहात. धर्माचे रक्षण करणे, हे मोठे कार्य आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (‘सीआर्पीएफ्’च्या) सैनिकांनी कुंभनगरी येथे व्यक्त केली.
प्रयागराज येथे नुकत्याच झालेल्या कुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सैनिक नियुक्त करण्यात आले होते. या सैनिकांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लावण्यात आलेल्या काश्मिरी आणि बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचारांच्या प्रदर्शनाला भेट दिली. त्या वेळी त्यांनी वरील मत मांडले. या प्रदर्शनात वर्ष १९९० मध्ये काश्मिरी हिंदूंवर, तसेच तेथील हिंदूंवर अत्याचार करून त्यांना एका रात्रीत काश्मीरमधून परागंदा व्हावे लागले होते. त्या वेळचे भीषण सत्य या प्रदर्शनाद्वारे मांडण्यात आले आहे. तसेच सध्या काश्मिरी हिंदूंच्या दुस्थितीविषयी प्रदर्शनात तक्ते लावण्यात आले आहेत. हे प्रदर्शन पाहून अनेक सैनिकांनी ‘प्रदर्शनात मांडलेली माहिती ही वस्तूस्थिती आहे’, असे सांगितले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन केसरी यांनी हे प्रदर्शन सैनिकांना दाखवले.