श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बेशिस्त बांधकाम करणारे आणि श्री साई संस्थानच्या प्रसादाचे कंत्राट बनावट संस्थेला देणारे यांच्यावर कठोर कारवाई करा ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती
कोल्हापूर : नुकतेच पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वास्तूला बेशिस्त बांधकामामुळे धोका निर्माण झाल्याचे आणि शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानने प्रसादाचा लाडू बनवण्याचे कंत्राट एका बनावट संस्थेला देण्यात आले. श्री विठ्ठलाच्या प्राचीन मंदिराच्या छतावर घालण्यात आलेला स्लॅब आणि अनेक ठिकाणी करण्यात आलेली अयोग्य बांधकामे कशी करण्यात आली ? श्री साई संस्थानच्या वतीने देण्यात येणार्या प्रसादाचे कंत्राट खोट्या संस्थेला कसे देण्यात आले ? शासननियुक्त समितीला हे लक्षात का आले नाही कि याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले ? शासनदरबारी चालणारा हा भ्रष्ट आणि गलथान कारभार शासकीय मंदिर समित्यांमध्येही फोफावला आहे, हे गंभीर असून दोन्ही प्रकरणांची चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. या समस्येचे मूळ हे मंदिरांच्या सरकारीकरणात असल्याने राज्यातील मंदिरे सरकारीकरणमुक्त करून भक्तांच्या कह्यात द्यावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी केली. ते २७ फेब्रुवारीला येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात बोलत होते. या वेळी शिवसेना करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांनीही मनोगत व्यक्त केले.
अन्य मनोगत
- श्री. रामभाऊ मेथे, शिवसेना – फाळणीच्या वेळी मुसलमानांसाठी पाकिस्तान निर्माण केले; मात्र सद्यस्थितीत पाकिस्तानातील मदरशांपेक्षा १० पट अधिक मदरसे भारतात आहेत. एक आतंकवादी ४४ जणांना ठार करतो. उत्तरप्रदेशातील ४६ मदरशांनी माहिती दिलेली नाही. त्यामुळे भारतातील मदरशांवर तात्काळ बंदी घालावी.
- श्री. किशोर घाटगे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष – भारतावर आक्रमण करणार्या आतंकवाद्यांना अंतर्गत साहाय्य मिळते. मदरशांतून जिहादी सिद्ध होतात. त्यामुळे भारत अशांत आहे.
- संभाजी साळुंखे, सेवाव्रत प्रतिष्ठान – पाकिस्तानसारखा उघड शत्रू परवडला; मात्र देशांतर्गत शत्रूंचे निर्दालन अत्यावश्यक आहे. भारत आता गांधीवादी नाही, तर तो स्वा. सावरकरवादी बनला आहे. यापुढे जशास तसे उत्तर देण्यात येईल.
उपस्थित मान्यवर : शिवसेनेचे श्री. धर्माजी सायनेकर, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, महिला आघाडीच्या दीपाली खाडये, सुवर्णा पोवार, पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. सुनील पाटील, हिंदु एकता आंदोलनचे महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष श्री. दिलीप भिवटे, वन्दे मातरम् युथ ऑर्गनायझेशनचे श्री. अवधूत भाटये
या वेळी करण्यात आलेल्या अन्य मागण्या : हिंदूंच्या निर्घृण हत्यांच्या षड्यंत्राचा ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणे’कडून सखोल तपास करा, आतंकवादाचे मूळ असलेले मदरसे आणि आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ यांवर तात्काळ बंदी घाला, धर्मांधांच्या धमक्यांमुळे विस्थापित झालेल्या जमशेदपूर येथील हिंदु परिवारांचे पुनर्वसन करून त्यांना सुरक्षा पुरवा.