Menu Close

लैंगिक शोषणाचे प्रकरण : व्हॅटिकनचे आर्थिक व्यवहार प्रमुख कार्डिनल जॉर्ज पेल यांना पदावरून हटवले

व्हॅटिकनमधील मोठ्या पदावरील पाद्य्राला लैंगिक शोषणाच्या प्रकरणी दोषी ठरवून त्यांची पदावरून हकालपट्टी होते, तरी भारतातील पुरो(अधो)गामी, निधर्मी असणारे ख्रिस्तीप्रेमी, तसेच ख्रिस्ती मालकांची प्रसारमाध्यमे मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !

व्हॅटिकन सिटी : २ मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी व्हॅटिकन सिटीमधील आर्थिक व्यवहारांचे प्रमुख कार्डिनल जॉर्ज पेल यांना पदावरून हटवण्यात आले आहे. व्हॅटिकनचे प्रवक्ते अलेसांद्रो गिसोटी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. पोप फ्रान्सिस यांनी वर्ष २०१४ मध्ये जॉर्ज पेल यांची या पदावर नियुक्ती केली होती. लैंगिक शोषणाच्या प्रकरणी पेल यांना ऑस्ट्रेलियातील न्यायालयाने दोषी ठरवले होते. लैंगिक शोषणाच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले जॉर्ज हे व्हॅटिकनमधील पहिले मोठे पदाधिकारी आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *