-
चिपळूण येथे संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती सेवा संस्थान संचालित गोशाळा आयोजित विश्वकल्याण महोत्सव !
-
प.पू. साध्वी ऋतंभरादेवीजी यांची हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतली भेट
चिपळूण : येथे विश्वकल्याण महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या श्रीमद्भागवत कथा सप्ताहाकरता आलेल्या प.पू. साध्वी ऋतंभरादेवीजींची आज हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भेट घेण्यात आली. प.पू. साध्वीजींना समितीच्या वतीने चालू असलेल्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याविषयी माहिती समितीचे डॉ. हेमंत चाळके यांनी दिली. त्या वेळी ‘हे कार्य चांगले असून प.पू. गुरुदेवजींना माझा प्रणाम सांगा आणि आश्रम भेटीसाठी अवश्य येऊ’, असे प.पू. साध्वी ऋतंभरादेवीजींनी या वेळी सांगितले. त्यांनी समितीची माहिती पुस्तिका, तसेच दैनिक सनातन प्रभात मधील त्यांच्या प्रवचनांचे वृत्त पाहिले.
त्याआधी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून प.पू. साध्वी ऋतंभरादेवीजींचा सन्मान सौ. दर्शना गायकर यांनी केला. या वेळी त्यांनी उपस्थित समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक यांना स्वहस्ते प्रसाद दिला. या वेळी सनातन संस्थेचे श्री. ज्ञानदेव पाटील आणि समितीचे प्रथमेश शिंदे उपस्थित होते.
साध्वी ऋतंभरादेवीजी यांच्या नित्य पूजेतील गोपालकृष्ण, देवीची प्रतिमा आणि पाऱ्याचे शिवलिंग. यातील पाऱ्याचे शिवलिंग वैशिष्ट्यपूर्ण आहे. शिवलिंगात असलेला पारा एवढा घन (घट्ट) अन्यत्र पहायला मिळत नाही. या शिवलिंगाच्या दर्शनाने सहस्त्र शिवलिंगांच्या दर्शनाचा लाभ होतो, असे साध्वीजींच्या सेवेकऱ्यांंनी सांगितले. (शिवलिंग गोलात दाखवले आहे.)