सैनिकांच्या पराक्रमाचा आनंदोत्सव साजरा करतांना फटाके वाजवल्याचे प्रकरण
- राष्ट्रप्रेमी नागरिकांवर भांडुप (मुंबई) पोलीस ठाण्यातील पोलिसांची दंडेलशाही !
- भारताच्या यशानंतर भारतीय आनंदोत्सव साजरा करणार नाहीत तर काय पाकडे करणार का ? सैनिकांचा आनंदोत्सव साजरा करणार्यांना मारहाण करणारे पोलीस भारतातील कि पाकिस्तानातील ?
धर्मांधांना घाबरून पोलीस राष्ट्रप्रेमी हिंदूंवर कारवाई करतात, असे केवळ भारतातच होऊ शकते. देशाचा अभिमान बाळगण्यापेक्षा धर्मांधांची भीती बाळगणारे पोलीस देशासाठी लाजिरवाणे होय. अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनाचाच हा परिणाम होय !
मुंबई : भारतीय हवाई सेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन आतंकवाद्यांचे अड्डे नष्ट केल्याचा फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करणार्या हिंदु युवकांच्या विरोधात धर्मांध युवकाने केलेल्या तक्रारीवरून भांडुप पोलीस ठाण्यातील पोलिसांनी भाजपच्या युवा मोर्च्याचे विधानसभाक्षेत्र उपाध्यक्ष अमर झा यांना मारहाण करून कारागृहात डांबण्याचा लांच्छनास्पद प्रकार घडला. फटाके वाजल्यामुळे धर्मांधांकडून विरोध होऊन परिस्थिती चिघळू नये, यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली.
भारतीय सेनेने केलेल्या पराक्रमाचा विजयोत्सव साजरा करतांना २४ फेब्रुवारी या दिवशी भांडुप येथील श्रीरामपाडा येथे काही हिंदु मुले फटाके वाजवत असतांना शहेनशहा या धर्मांध युवकाने त्यांना ओरडण्यास प्रारंभ केला. त्या वेळी अन्य एका धर्मांध महिलने हिंदु मुलांना दमदाटी केली. या वेळी तेथे अमर झा आले. त्यांनी याविषयी भांडुप पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार केली; मात्र पोलिसांनी झा यांनाच कह्यात घेऊन मारहाण केली. या वेळी पोलीस अधिकार्यांनी ‘फटाके वाजवायचे असतील, तर सीमेवर जाऊन वाजवा’, असे संतापजनक वक्तव्य केले. यानंतर पोलिसांनी शहेनशहा यालाही बोलावून मारहाण केली. त्यानंतर दोघांना कारागृहात डांबून दुसर्या दिवशी दंड आकारून सोडून दिले.