Menu Close

नागपूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

दीपप्रज्वलन करतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग बिंड आणि सनातन संस्थेच्या अधिवक्त्या (सौ.) वैशाली परांजपे

नागपूर : येथील हुडकेश्‍वर नाका येथील श्री हनुमान मंदिराच्या सभागृहात नुकतीच हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. या सभेत सनातन संस्थेच्या अधिवक्त्या (सौ.) वैशाली परांजपे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग बिंड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सभेला राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सनातन संस्थेच्या अधिवक्त्या (सौ.) वैशाली परांजपे या वेळी म्हणाल्या, ‘‘साधना आणि धर्माचरण यांमुळे ईश्‍वराची कृपा संपादन करता येते आणि संतांचे आशीर्वाद मिळतात; म्हणून प्रत्येक हिंदूने साधना करणे आवश्यक आहे.’’

हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग बिंड या वेळी म्हणाले, ‘‘प्रत्येक क्षेत्रातील दुष्ट प्रवृत्तींना रोखले पाहिजे. शिवरायांचे मावळे बनून हिंदु राष्ट्र निर्माण करण्याची प्रतिज्ञा सगळ्यांनी केली पाहिजे.’’

क्षणचित्र : सभेनंतरच्या बैठकीमध्ये वयस्कर धर्मप्रेमी अधिक होते; तरीही त्यांनी उत्स्फूर्तपणे धर्म जाणून घेण्यासाठी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.

सहकार्य : सभास्थळ आणि वीज मंदिरातील विश्‍वस्तांनी विनामूल्य उपलब्ध करून दिली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *