Menu Close

मसूद अझहरची दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याचे वृत्त

  • मसूद शेवटची घटका मोजत असला, तरी पाकने त्याला भारताच्या कह्यात द्यायला हवे ! त्याला भारताकडून आतंकवादासाठी शिक्षा मिळालीच पाहिजे !
  • मसूद आजारी आहे, हा पाकचा बनाव आहे, हेच लक्षात येते. जर मसूद खरच आजारी असेल, तर त्याची वैद्यकीय तपासणी आंतरराष्ट्रीय डॉक्टरांकडून करवून त्याचा अहवाल जगासमोर दाखवण्याचे पाक मान्य करील का ?

नवी देहली :  जैश-ए-महंमदचा ५० वर्षीय प्रमुख मसूद अजहर याची दोन्ही मूत्रपिंड निकामी झाली आहेत. तो सध्या पाकच्या रावळपिंडी येथील एका सैनिकी रुग्णालयात  ‘डायलिसीस’ करत आहे, असे वृत्त आहे. एका वरिष्ठ सुरक्षा अधिकार्‍याने ही माहिती दिली आहे. मसूद अझहर आजारी असल्याचे पाकचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी यापूर्वी म्हटले होते.

  •  मसूद अझहर हा ओसामा बिन लादेन याचा जवळचा सहकारी होता. मसूूदने अनेक आफ्रिकी देशांमध्ये आतंकवादाला उत्तेजन दिले. त्याने ब्रिटनमधील मशिदींमध्येही जिहादची शिकवण दिली होती. तो पाकमध्ये मौलवी म्हणून प्रसिद्ध आहे.
  • मसूदला वर्ष १९९४ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये जिहादची शिकवण देण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
  • मसूद भारताच्या कारागृहात असतांना वर्ष १९९९ मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करून आतंकवाद्यांनी त्याला मुक्त करवून घेतले होते. त्याला सोडल्यावर लादेनने मसूदसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *