Menu Close

(म्हणे) ‘जैश-ए-महंमदने पुलवामाच्या आक्रमणाचे दायित्व घेतलेलेच नाही !’

पाकचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांचा जावईशोध

  • या विधानावरून जैश-ए-महंमद ही पाक सरकार पुरस्कृत आतंकवादी संघटना आहे, हे लक्षात येते !
  • त्यामुळे तिच्यावर पाककडून कोणतीही कारवाई करण्याची अपेक्षा करता येणार नाही.
    म्हणून आता भारताने मसूद अझहरसह या संघटनेचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी कारवाई करावी !

लाहोर : पाकचे सरकार जैश-ए-महंमदच्या संपर्कात आहे. आमच्या निकटवर्तीयांनी जैशकडे पुलवामाच्या आक्रमणाविषयी विचारणा केली होती. जैशने म्हटले आहे की, पुलवामा येथील आक्रमण आम्ही केलेलेच नाही. असे असतांना सर्वत्र अपसमजाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे विधान पाकचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केले आहे. ‘जैशशी कुणी संपर्क साधला होता ?’, हे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. ‘बीबीसी’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे विधान केले आहे. यापूर्वी कुरेशी यांनी ‘सीएन्एन्’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मसूद अझहर पाकिस्तानमध्येच असून तो आजारी असल्याचे म्हटले होते. (पाकचे परराष्ट्रमंत्री खोट्यावर खोटे बोलण्यासाठी आता वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत सुटले आहेत, असेच लक्षात येते ! विदेशी वृत्तवाहिन्याही अशांची विधाने प्रसारित करून त्यांच्या खोटेपणावर पांघरूण घालतात. भाजप सरकारने प्रथम अशा वृत्तवाहिन्यांना खडसावणे आवश्यक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पुलवामा येथील आक्रमणानंतर जैशनेच याचे दायित्व स्वीकारले होते. याविषयी त्याने व्हिडिओही प्रसारित केला होता.

कुरेशी पुढे म्हणाले की, आजच्या घडीला युद्ध हा कुठल्याही समस्येवर तोडगा ठरू शकत नाही. एकमेकांवर क्षेपणास्त्रेे डागल्याने समस्या सुटणार नाही. युद्ध करणे, हे आत्मघाती पाऊल ठरू शकते. (युद्ध हे पाकसाठी आत्मघाती ठरणार आहे; म्हणून तो आतंकवादाच्या माध्यमातून छुपे युद्ध करत आहे. आता भारताने युद्ध करून पाकला संपवणे आवश्यक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *