Menu Close

जयपूर येथे धर्मांधांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

अशा वासनांध धर्मांधांना तात्काळ फासावर लटकवा ! त्यामुळे पुन्हा कोणी असे दुष्कर्म करण्याचे धाडस करणार नाही !

जयपूर (राजस्थान) : येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी आरिफ कुरैशीसह त्याच्या शाहरूख आणि रहिम या सहकार्‍यांना अटक केली आहे. त्यामुळे धर्मांधांची पुन्हा वासनांध प्रवृत्ती समोर आली आहे.

१. आरिफ कुरैशीचा फ्रूट चाटचा ठेला आहे. या दुकानामुळे काही दिवसांपूर्वी त्याची ओळख १६ वर्षीय मुलीशी झाली.

२. या ओळखीतून आरोपीने पीडितेला फूस लावून एका हॉटेलमध्ये नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला.

३. त्यानंतर आरिफने या पीडितेला रहिम आणि शाहरुख या त्याच्या मित्रांकडे सोपवले. त्यानंतर त्यांनीही बलात्कार केला. शेवटी पुन्हा तिघांनी मिळून तिच्याशी दुष्कर्म केले.

४. त्यानंतर आरोपींनी २-३ दिवस तिला वेगवेगळ्या हॉटेल्स आणि निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडितेने सांगितले.

५. अल्पवयीन पीडिता १० वीची परीक्षा चालू असतांना अचानक बेपत्ता झाल्यामुळे तिच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती. या तक्रारी नंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *