धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच हिंदू पाश्चात्त्य संस्कृतीचा अवलंब करतात ! – ब्रह्मश्री पुराण वाचस्पती महेश्वर शर्मा, करीमनगर, तेलंगण
करीमनगर (तेलंगण) : हिंदूंना धर्माविषयी शिक्षण मिळत नाही. त्यामुळे ते पाश्चात्त्य संस्कृतीचा अवलंब करत आहेत. हिंदु धर्माविषयीची माहिती देण्यासाठी अशा सभा घ्याव्या लागत आहेत. त्यासाठी हिंदु जनजागृती समितीविषयी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ‘मनु’ नावाच्या महर्षीने ‘मनुस्मृती’मध्ये हिंदु धर्माचे नियम सांगितले आहेत. भारतभूमी ही पुण्यभूमी आहे. त्यामुळे देवताही भारतभूमीत जन्म घेण्यासाठी इच्छुक असतात. हे सर्व लक्षात घेऊन आपण धर्माचे पालन केले पाहिजे, असे उद्गार ब्रह्मश्री पुराण वाचस्पती श्री. महेश्वर शर्मा यांनी हिंदु राष्ट्र-जागृती सभेत काढले. या वेळी व्यासपिठावर प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. बंडी संजय, हिंदु जनजागृती समितीचे तेलंगण आणि आंध्रप्रदेश या राज्यांचे समन्वयक श्री. चेतन गाडी उपस्थित होते. सनातन संस्थेच्या सौ. विनुता शेट्टी याही सभेस उपस्थित होत्या.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तेलंगणच्या करीमनगर जिल्ह्यातील ‘आर्ट्स कॉलेज’ मैदानात हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या सभेला धर्माभिमानी हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सभेला १ सहस्र २०० धर्माभिमानी उपस्थित होते.
देशाच्या आंतरिक शत्रूंचा नाश करण्यासाठी मोदी यांनी ठोस कृती करावी ! – चेतन गाडी
पुलवामा येथील आक्रमणाच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्यदलाला आतंकवाद्यांना ठार मारण्याविषयी दिलेली मोकळीक, हा एक चांगला निर्णय होता. यासह देशाच्या आंतरिक शत्रूंचा नाश करण्यासाठी मोदी यांनी ठोस कृती केली पाहिजे, अशी मागणी समस्त हिंदू या सभेच्या माध्यमातून करत आहेत. या देशात ‘१५ मिनिटांच्या अवधीत आम्ही आमची सत्ता दाखवू’, असे म्हणणार्या ओवैसी यांना सभा घेण्यासाठी अनुमती मिळते. ‘भारत तेरे तुकडे होंगे’, असे म्हणणार्या कन्हैया कुमारला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे; परंतु देशाच्या अखंडतेविषयी बोलणार्या टी. राजासिंह यांना सभेत बोलण्याची अनुमती मिळत नाही. ही धर्मनिरपेक्षता आहे का ? हिंदूंना न्याय मिळायला हवा असेल, तर तो हिंदु राष्ट्रातच मिळेल. त्यासाठी आपण संघटित होऊन हिंदु राष्ट्राची मागणी केली पाहिजे.
क्षणचित्रे
- या सभेस प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे आमदार टी. राजासिंह यांना उपस्थित रहाण्यासाठी अनुमती मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांचा संदेश भ्रमणभाषच्या माध्यमातून त्यांच्याच आवाजात सभेतील उपस्थितांना ऐकवण्यात आला. त्यास लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. (हिंदुत्वनिष्ठांवर अशा प्रकारची बंदी घालणारे तेलंगण सरकार भारताचे कि पाकिस्तानचे ? – संपादक, हिंदुजागृती)
- सभेसाठी अनुमती मिळाल्यानंतर सभेची सिद्धता करण्यासाठी २४ घंटेही नव्हते. त्या वेळी स्थानिक धर्माभिमानी हिंदूंनी सभेच्या सिद्धतेसाठी साहाय्य केले आणि सर्व सिद्धता वेळेत पूर्ण झाली.
ही तपासणी सभेमध्ये घातपात होऊ नये, यासाठी नाही, तर धर्माभिमानी हिंदूंना त्रास देण्यासाठीच होती, असेच यातून स्पष्ट होते !
सभेला येणार्या प्रत्येक धर्माभिमानी हिंदूची पोलिसांकडून तपासणी
पोलिसांनी सभेला येणार्या लोकांची तपासणी करण्यासाठी यंत्र उभारले होते. प्रत्येकाला सभास्थळी जाण्यासाठी या यंत्राच्या आतून जावे लागत होते. (आतंकवाद्यांची आणि त्यांच्या समर्थकांची अशी तपासणी पोलिसांनी आतापर्यंत केली असती, तर देशातील आतंकवाद कधीच नष्ट झाला असता ! काश्मीरमध्ये सैन्यावर दगडफेक करणार्यांना अटक केली जात नाही किंवा त्यांची अशी तपासणी केली जात नाही; मात्र राष्ट्र आणि धर्म यांसाठी आयोजित सभेला येणार्या धर्माभिमानी हिंदूंची अशी तपासणी केली जाते, हे लक्षात घ्या ! – संपादक)