Menu Close

विहिंपचे कार्यकर्ते राजू यांच्या मारेकर्‍यांवर त्वरित कारवाई करा ! – निपाणी येथे निवेदन

तहसीलदार पुजारी (मध्यभागी निवेदन स्वीकारतांना) यांना निवेदन देतांना विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते

निपाणी (जिल्हा बेळगाव) : १४ मार्च या दिवशी म्हैसूर येथे विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते राजू यांच्या मारेकर्‍यांना तात्काळ अटक करावी, त्याचप्रकारे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हत्यांच्या वाढत्या घटना पहाता त्यांना संरक्षण देण्यात यावे. भाग्यनगर येथील खासदार असदुद्दीन औवेसी याने ‘भारतमाता की जय’ म्हणण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्याची खासदारकी रहित करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन निपाणी येथे तहसीलदार पुजारी यांना विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने देण्यात आले. या वेळी सर्वश्री नीलेश हत्ती, योगेश चौगुले, अजित पाटील, राजेश मुरंत, सागर श्रीखंडे, दुर्गा सेनेच्या सुचित्रा कुलकर्णी, श्रीराम सेना, श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदु जनजागृती समिती, बजरंग दल, विहिंप यांसह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *