Menu Close

ऑस्ट्रेलियाच्या दोषी कार्डिनलवर आणखी एक लैंगिक शोषणाचा गुन्हा नोंद

‘पाद्री म्हणजे वासनांध व्यक्ती’, असे कोणी म्हणू लागल्यास व्हॅटिकनकडे यावर काय उत्तर असणार ?

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) : वर्ष १९९० मध्ये लहान मुलांचे लैंगिक शोेषण केल्यावरून दोषी ठरवण्यात आलेले ऑस्ट्रेलियाचे कार्डिनल जॉर्ज पेल यांच्यावर वर्ष १९७० मध्ये २ लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणावरून नवीन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (वर्ष १९७० मध्येच पेल यांच्यावर कठोर कारवाई झाली असती, तर त्यांनी नंतर असे गुन्हे केले नसते. त्यांची पाद्री पदावरूनही हकालपट्टी होणे आवश्यक होते; मात्र ती करण्यात आली नाही. त्यामुळे ते पुढे कार्डिनल झाले आणि नंतर त्यांना व्हॅटिकनचे मोठे दायित्व देण्यात आले. यावरून चर्चचा कारभार कसा चालतो, हे लक्षात येते ! ‘अशा लोकांचा भरणा असेल, तर चर्चमध्ये लोकांनी का जावे ?’, असा प्रश्‍न निर्माण होतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पेल यांना आधीच्या प्रकरणांत दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्यांना व्हॅटिकन चर्चच्या आर्थिक व्यवहाराच्या पदावरून हटवण्यात आले होते. पेल सध्या कारागृहात आहेत, त्यांना अद्याप शिक्षा सुनावण्यात आलेली नाही.

पेल यांच्या विरोधात ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथील बल्लारत शहरामध्ये तरण तलावात लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणावर खटला चालू होता; मात्र दुसर्‍या प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आल्यावर हा खटला बंद करण्यात आला. त्यामुळे व्हिक्टोरिया येथील पीडितांनी संताप व्यक्त केला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *