कोची (केरळ) : थोपुंपडी (कोची) येथील श्री घंडाकरनन मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने २ मार्च २०१९ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान घेण्यात आले. या मंदिरात प्रत्येक शनिवारी आयोजित करण्यात येणार्या विशेष पूजा कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना ‘महाशिवरात्रीचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.
समितीच्या कु. अदिती सुखटणकर यांनी विषय मांडला. या वेळी त्यांनी भगवान शिवाची वैशिष्ट्ये, भगवान शिव या नावाचा अर्थ, शिवाला अर्धप्रदक्षिणा घालण्यामागचे कारण, महाशिवरात्रीच्या वेळी भगवान शिवाच्या नामजपाचे महत्त्व इत्यादी विषयी माहिती सांगितली. अनुमाने ३५ जिज्ञासूंनी या प्रवचनाचा लाभ घेतला. कार्यक्रमस्थळी सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.