भाग्यनगर : १३ मार्च या दिवशी येथे शिवसेना, विश्व हिंदू परिषद, शिवशक्ती, भगवद्गीता जागृती समिती, नेताजी स्फूर्ती केंद्रम्, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांनी एकत्र येऊन राष्ट्रीय हिंदू आंदोलन केले. या आंदोलनाद्वारे तीन मागण्या करण्यात आल्या.
यात जेएनयूतील देशद्रोह्यांवर कठोर कारवाई करावी, कर्नाटक आणि केरळ येथे हिंदुत्ववाद्यांच्या झालेल्या हत्यांच्या प्रकरणी धर्मांधांच्या विरोधात कारवाई करावी, तसेच द्रौपदीचा अवमान करणार्या तेलुगु पुस्तकाच्या विरोधात कारवाई करावी, या मागण्यांचा समावेश होता.
या वेळी ६० हून अधिक धर्माभिमानी हिंदू सहभागी झाले होते. शिवसेनेचे राज्यप्रमुख श्री. मुरली, शिवशक्तीचे अध्यक्ष श्री. करुणाकर, हिंदू जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. चेतन जनार्दन आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात