नगरकोईल (तमिळनाडू) : येथील मंडई काडू गावातील श्री भगवती अम्मा मंदिराच्या वार्षिक महोत्सवात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विशेष व्याख्यान आणि ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. समितीच्या वतीने सनातनच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी ‘हिंदु राष्ट्र आणि त्याची आवश्यकता’ या विषयावर व्याख्यान दिलेे. समितीचे श्री. प्रभाकरन् या महोत्सवात सहभागी झाले होते. १० दिवस चालणारा हा महोत्सव ३ मार्च २०१९ पासून चालू झाला आहे. अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि आध्यात्मिक संस्था यांनी या महोत्सवात भाग घेतला आहे. या वेळी सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या तमिळ भाषेतील विविध ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याचा उपस्थितांनी लाभ घेतला.
केंद्रीयमंत्री श्री. पोन राधाकृष्णन् हे दुसर्या दिवशीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी या वेळी उपस्थितांना संबोधित केले. त्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्रासाठी काय आवश्यक आहे ?’ हा तमिळ भाषेतील ग्रंथ भेट देण्यात आला.