Menu Close

वर्ष २०२३ मध्ये भगवंताच्या कृपेने हिंदु राष्ट्र येणारच : कु. प्रतीक्षा कोरगावकर

सुरेगाव, नेवासा (जिल्हा नगर) येथे झालेली हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

नेवासा : राष्ट्र आणि धर्म यांवर कितीही आघात झाले, तरी वर्ष २०२३ मध्ये भगवंताच्या कृपेने हिंदु राष्ट्राची स्थापना निश्‍चित होणारच, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी केले. त्या नुकत्याच सुरेगाव, नेवासा (जिल्हा नगर) येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होत्या. सभेला ३०० हून अधिक धर्मप्रेमी युवक आणि महिला उपस्थित होत्या. सभेच्या शेवटी सर्व ग्रामस्थांनी वाढदिवस केक न कापता साजरा करण्याचा, तसेच आईला ‘मम्मी’ न म्हणण्याचा निश्‍चय केला. गावातील अनेक युवकांनी पुढाकार घेऊन सभेची सिद्धता केली होती.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *