मुसलमानांच्या लांगूलचालनाचे टोक गाठणारे समाजवादी पक्षाचे उत्तरप्रदेश शासन !
- यावर ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी तोंड उघडणार नाहीत; कारण त्यांच्या मते हीच धर्मनिरेपक्षता आहे !
- लोकहो, जनतेच्या करातून मिळणारा पैसा अशा कार्यासाठी खर्च करणार्या उत्तरप्रदेश शासनाला जाब विचारा !
- हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीच्या वेळी मशिदीतून होणारी आक्रमणे रोखण्यासाठी कधी प्रयत्न केले जातात का ?
बरेली (उत्तरप्रदेश) : हिंदु आणि मुसलमान यांची लोकसंख्या ५०-५० टक्के असल्याने धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असणार्या बरेली शहरामध्ये होळीच्या सणात शांतता राखण्यासाठी प्रशासनाने एक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार २४ मार्चला होळीच्या दिवशी मशिदींवर रंग उडाला, तर प्रशासनाने स्थापन केलेले रंगरंगोटी करणारे पथक लगेच त्यावर पांढरा रंग लावतील.
संपूर्ण बरेली शहरात एकूण ३००, तर संपूर्ण बरेली जिल्ह्यात एक सहस्र मशिदी आहेत. तसेच प्रशासनाने डीजे संगीताला अनुमती नाकारली आहे. येथे डीजे संगीताच्या आधारे आखाड्याकडून शक्तीप्रदर्शन केले जाते. त्यात तलवारसहित अन्य शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन केले जाते. त्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात