Menu Close

पाकमध्ये चुकून गेलेल्या भारतियाची ७ वर्षांनंतर सुटका

पाकमध्ये चुकून गेलेल्या भारतियाला शिक्षा होते; मात्र भारतात घुसखोरी करणार्‍या पाक आणि बांगलादेशी मुसलमानांना भारत कोणतीही शिक्षा करत नाही, हे लक्षात घ्या !

लाहोर : वर्ष २०१२ मध्ये म्हणजे ७ वर्षांपूर्वी पाकिस्तानात चुकून प्रवेश केलेल्या गुलाम कादीर या भारतीय व्यक्तीला ११ मार्च या दिवशी अटारी सीमेवर सीमा सुरक्षा दलाकडे सोपवण्यात आले. पाकिस्तानात अनधिकृतरित्या प्रवेश केल्यावरून तेथील न्यायालयाने त्याला ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. शिक्षा भोगल्यानंतर त्याची ७ वर्षांनंतर सुटका करण्यात आली. गेल्या महिन्यात चुकून पाकिस्तानात प्रवेश केलेल्या एका लहान मुलाला सदिच्छा म्हणून परत भारतात पाठवण्यात आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *