Menu Close

हिंदुद्वेषी ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’च्या विरोधात कोल्हापूर, सोलापूर आणि फलटण येथे प्रशासनाला निवेदन

कोल्हापूर

निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ आस्थापनाच्या ‘सर्फ एक्सेल’ या उत्पादनाचे रंगपंचमीनिमित्त एक विज्ञापन प्रसारित केले आहे. या विज्ञापनात हिंदूंच्या सणांच्या निमित्ताने पुन्हा एकदा हेतूतः हिंदूंचा अपमान केला आहे. यापूर्वीही या आस्थापनाच्या अनेक विज्ञापनांतून हिंदूंचा, हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अपमान केला गेला आहे. त्यामुळे ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ने प्रसारित केलेली ‘सर्फ एक्सेल’ आणि ‘रेड लेबल’ चहा यांची विज्ञापने हिंदूंच्या भावना दुखावणारी असल्याने ही विज्ञापने तत्काळ मागे घेण्यात यावीत आणि हिंदु समाजाची जाहीर क्षमायाचना करावी, या मागणीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संजय शिंदे यांना हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने निवेदन देण्यात आले. याच मागणीचे निवेदन सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयातही देण्यात आले.

या वेळी हिंदु महासभा जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, शहर उपाध्यक्ष श्री. संतोष पवार, रिक्शा युनियन जिल्हाध्यक्ष श्री. विजय बोंद्रे, रिक्शा युनियन जिल्हाउपाध्यक्ष श्री. कुमार काटकर, महिला प्रदेशाध्यक्ष सौ. दिपाली खाडे, जिल्हा उपाध्यक्ष रेखा दुधाणे, नामदेव शिंपी समाजाचे श्री. मुकुंद कपडेकर, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी केलेल्या अन्य मागण्या

१. ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’कडून वारंवार हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असून या आस्थापनावर भा.दं.सं. कलम २९५ अ नुसार तत्काळ गुन्हा नोंद करण्यात यावा.

२. ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ने हिंदूंची क्षमायाचना करणारे विज्ञापन विविध माध्यमांद्वारे प्रसारित करावे.

३. होळी आणि रंगपंचमी या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांवर आळा घालावा आणि महिला सुरक्षेसाठी सहकार्य करावे.

सोलापूर

सोलापूर येथील तहसीलदार श्रीकांत पाटील (उजवीकडे) यांना निवेदन देतांना

‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ आस्थापनाच्या ‘सर्फ एक्सेल’ या उत्पादनाने रंगपंचमीनिमित्त एक विज्ञापन प्रसारित केले आहे. या विज्ञापनातून हिंदूंच्या सणाच्या निमित्ताने हेतूत: हिंदूंचा अवमान केला गेला आहे. असे प्रकार अनेक वेळा घडत आहेत. यापुढे असे प्रकार घडू नयेत, यासाठी केंद्रशासनाने आस्थापनावर त्वरित कारवाई करावी या मगणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. हे निवेदन तहसीलदार (महसूल) श्रीकांत पाटील यांनी स्वीकारले.

फलटण (जिल्हा सातारा)

येथे तहसीलदार श्री. हनुमंत पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्री. उदय ओझर्डे यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *