१. पाण्याच्या अभावामुळे विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्तींची उघड्यावर पडून विटंबना होणे आणि शिरसई येथील सरपंच श्री. आनंद टेमकर यांनी मूर्तींचे नदीतील खोल पाण्यात विसर्जन करणे
श्री गणेशचतुर्थीच्या काळात शिरसई येथील तलावात विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्ती पाण्याच्या अभावामुळे उघड्यावर पडून विटंबना होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर तेथील सरपंच श्री. आनंद टेमकर यांनी तत्परतेने एका वाहनाचे आयोजन केले. ग्रामस्थ आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्या सहकार्याने त्यांनी जवळच्या नदीतील खोल पाण्यात या मूर्तींचे विसर्जन केले. आगामी काळात श्री गणेशचतुर्थीला शिरसई येथील तलावात प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास बंदी घालण्यात येईल, अशी माहिती श्री. आनंद टेमकर यांनी दिली.
२. शाळा आणि महाविद्यालये येथे व्हॅलेंटाईन डेविषयी प्रबोधन करणारे प्रवचन आयोजित करणार्या केशव स्मृती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा कोरगावकर !
समितीचे कार्यकर्ते वास्को येथील केशव स्मृती विद्यालयात व्हॅलेंटाईन डेविषयी निवेदन द्यायला गेले असता तेथील मुख्याध्यापिका सौ. सुषमा कोरगावकर यांनी शाळेतही मुलांचे व्हॅलेंटाईन डेविषयी प्रबोधन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. लगेच ११.२.२०१६ या दिवशी त्यांनी शाळा आणि महाविद्यालय या दोन्हीही ठिकाणी प्रवचने आयोजित केली.
– आधुनिक वैद्य मनोज सोलंकी, मडगाव, गोवा. (१.३.२०१६)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात