धुळे : धुळे येथे नदी, मंदिरे अन् झाडाखाली टाकून दिलेल्या देवतांची चित्रे, मूर्ती आणि संतांची छायाचित्रे यांचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्थानिक हिंदु धर्मप्रेमींच्या साहाय्याने पाण्यात विसर्जन करण्यात आले. या वेळी कालिका माता मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, गणपती मंदिर येथील मंदिरांच्या बाहेर ठेवलेल्या खंडित मूर्तींचे विसर्जन हत्ती डोह येथे करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सचिन वैद्य, पंकज बागुल, दर्शन बागुल, संतोष मराठे, भूषण बागुल, अनिरुद्ध कुलकर्णी, शेखर कुळकर्णी, पुनीत वराडे, सचिन वराडे, गोपाल शर्मा, भैया माळी, प्रवीण दडपे, गणेश दडपे, संजय देवरे, सागर जोशी, प्रितेश अग्रवाल, भूषण दशपुते, चेतन जगताप, जे.बी. मोदी, दिलीप कुलकर्णी आदी धर्मप्रेमींनी या उपक्रमाद्वारे समाजाला धर्मशिक्षण देण्याचा प्रयत्न केला.
हिंदु जनजागृती समिती आणि सर्व धर्मप्रेमींनी धुळ्यातील समस्त हिंदु बांधवांना ‘त्यांच्या परिसरातील मूर्ती अन् छायाचित्रे यांचे अशाच प्रकारे विसर्जन करून देवता आणि संत यांचा होणारा अवमान थांबवावा’, असे आवाहन केले आहे.