अकोला
हिंदुस्थान युनिलिव्हर आस्थापनाच्या विरोधात येथे १२ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. कार्यालय अधीक्षक सौ. लता कानदे यांनी ते स्वीकारले.
हिंदुस्थान युनिलिव्हर या आस्थापनाकडून श्री गणेश जयंती, नवरात्र, कुंभमेळा आणि होळी यांचे औचित्य साधून हिंदुविरोधी विज्ञापने प्रसारित केली जात असल्याचे हिंदु जनजागृती समितीचे श्री. अजय खोत यांनी या वेळी स्पष्ट केले. निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते श्री. संतोष धोत्रे, श्री. राहुल चुटके उपस्थित होते.
नांदेड
हिंदुस्थान युनिलिव्हर आस्थापनाच्या बहुतांश उत्पादनांची विज्ञापने हिंदु धर्मियांच्या भावना दुखावणारी असून अशा प्रक्षोभक विज्ञापनांचे प्रक्षेपण बंद करावे, तसेच संबंधितांवर गुन्हा नोंद करावा, या मागणीचे निवेदन नांदेडचे उपजिल्हाधिकारी श्री. संतोष वेणीकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले. या वेळी श्री. बिरबल यादव, श्री. गौतम जैन, श्री. गणेश कोकुलवार,
श्री. गणेश फुलारी, श्री. गजानन गादेवार, श्री. संजय बोतकुलवार, श्री. संतोष पाम्पट्वार आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. उदय बडगुजर आणि श्री. मनोहर देशपांडे, सौ. रघोजीवार हे उपस्थित होते.