Menu Close

देशांतर्गत आतंकवाद संपवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक : वैद्य उदय धुरी

हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उपस्थित धर्माभिमानी

तुरमाळे (पनवेल) : भारतातील ८ राज्यांत हिंदू अल्पसंख्यांक झाले आहेत. आज आतंकवाद्यांशी संघर्ष न केल्यास जागोजागी पाकिस्तान झालेले पहावयास मिळेल. मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी तसेच देशांतर्गत इस्लामिक आतंकवाद, धर्मांतर, लव्ह जिहाद हे नष्ट करण्यासाठी हिंदूंचे संघटन करून घटनात्मक मार्गाने हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, ही काळाची आवश्यकता आहेे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते वैद्य उदय धुरी यांनी येथे केले.

७ मार्चला येथे आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त ते बोलत होते. या सभेला १३० धर्मप्रेमींची उपस्थिती लाभली. या सभेनंतर गावात मुलांसाठी धर्मशिक्षणवर्ग आणि स्वरक्षणवर्ग घेण्याची मागणी धर्मप्रेमींनी केली.

ही सभा यशस्वीपणे पार पडण्यासाठी गावातील तरुण मुले आणि महिला यांनी ग्रामदैवत श्री मरुआई मातेच्या चरणी प्रार्थना करून तिची ओटी भरली. तसेच या गावात सभेचा स्वतःहून प्रचार केला.

ही सभा यशस्वीपणे पार पडण्यासाठी गावातील तरुण मुले आणि महिला यांनी ग्रामदैवत श्री मरुआई मातेच्या चरणी प्रार्थना करून तिची ओटी भरली. तसेच या गावात सभेचा स्वतःहून प्रचार केला.

सहकार्य

धर्मप्रेमी सर्वश्री प्रकाश झिराळे, बाळाराम पाटील, सतीश हातमोडे, विजय झिराळे, गोपीनाथ मायदे, कु. भूषण हातमोडे, कु. समीर म्हसकर यांनी सहकार्य केल्याने ही सभा यशस्वीपणे पार पडली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *