भारतातील हिंदू अशी मागणी कधी करणार ?
नेवाडा (अमेरिका) : फ्लोरिडाच्या ‘हाऊस बिल १९५’ मध्ये वेद, उपनिषद आणि भगवद्गीता यांविषयीचे विधेयक समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी हिंदूंनी फ्लोरिडा राज्याच्या विधानसभा सदस्यांकडे केली आहे. तसेच या प्राचीन ग्रंथांवर आधारित अभ्यासक्रम फ्लोरिडातील सरकारी शाळांमध्ये ऐच्छिक विषय म्हणून लागू करण्यात यावा, अशीही मागणी हिंदूंनी केली आहे.
वेद, उपनिषद आणि भगवद्गीता या प्राचीन ग्रंथांमध्ये ज्ञान आणि विद्वत्ता भरलेली आहे. अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेणार्या या ज्ञानापासून फ्लोरिडातील विद्यार्थ्यांना वंचित ठेवू नये. मुलांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये सर्वगुणसंपन्नता आणण्यासाठी हे ग्रंथ साहाय्यभूत ठरणार आहेत, असे येथे प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात