होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा !
सांगली : होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी मिरज, जत आणि ईश्वरपूर येथे निवेदने देण्यात आली. जत येथे तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु धर्माभिमानी श्री. अजिंक्य राक्षे, श्री. बी.आर्. पाटील, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते.
मिरज येथे प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. या वेळी भाजपचे सर्वश्री सतीश नलवडे, प्रकाश जोशी, शिवसेनेचे सर्वश्री गजानन मोरे, संदीप कदम, भास्कर पवार, शशिकांत वाघमोडे, अजित दाणेकर, शिवसेना उद्योग आघाडीचे श्री. तात्या कराडे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
ईश्वरपूर येथे तहसीलदार आणि पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. मंदार चव्हाण, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) येथे तहसीलदार श्री. जलज शर्मा यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात