गुरुकृपायोगानुसार साधना आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवण्याचा धर्मप्रेमींचा निर्धार !
नांदेड : समाजातील धर्मप्रेमींना कोणतेही कार्य साधना म्हणून करण्यासाठी आणि त्यांना योग्य दिशा मिळण्यासाठी नांदेड येथील ‘हॉटेल रामकृष्ण इंटरनॅशनल’च्या सभागृहात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संघटक’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत वैयक्तिक जीवन आनंदी होण्यासाठी जीवनातील साधनेचे महत्त्व काय ? आणि त्यासमवेतच स्वत:तील स्वभावदोष दूर करण्यासाठी प्रयत्न का करायचे ? यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ‘या कार्यशाळेचा लाभ २० धर्मप्रेमींनी घेतला.