पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर): छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासाच्या निमित्ताने श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने पन्हाळा येथे १७ मार्च या दिवशी दुर्ग अभ्यास मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत हिंदु जनजागृती समितीने सहभाग घेतला. या वेळी वीर शिवा काशीद यांचे वंशज श्री. आनंदराव काशीद यांनी पन्हाळगड आणि ऐतिहासिक स्थळांची माहिती दिली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी होळी, रंगपंचमी, तसेच गुढीपाडवा यांचे महत्त्व सांगून सण, उत्सवात होणारे अपप्रकार रोखण्यासाठी काय प्रयत्न करावेत, याची माहिती देऊन त्या संदर्भातील हस्तपत्रके आणि भित्तीपत्रके दिली. कार्यक्रमाची सांगता ध्येयमंत्राने झाली.
या वेळी धर्मप्रेमी श्री. कृष्णात चौगुले, आळवे येथील श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. उल्हास पाटील, तिरपण येथील श्री. प्रवीण पाटील, श्री. रोहित पाटील आणि श्री. राजवर्धन पाटील, निपाणी येथील श्री. सूर्याजी मोरबाळे, टोप येथील श्री. सूरज पाटील, शिरोली येथील श्री. चेतन चव्हाण, बत्तीसशिराळा (सांगली जिल्हा) येथील श्री. शरद खुर्द, कोरोची येथील श्री. रोहित सुतार यांसह ३० धारकरी उपस्थित होते.