Menu Close

देहलीतील ओवैसींच्या घराबाहेर हिंदु सेनेची निदर्शने

नवी देहली : देशद्रोही वक्तव्य करणारे एम्आयएम्चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या देहलीतील अशोक रोड येथील घरासमोर हिंदु सेनेने आंदोलन करत त्यांच्या विरोधातील फलक लावले. (भारतमाता की जय म्हणण्यास नकार देणार्‍यांचे भारतावर किती प्रेम असेल, हे उघड आहे. अशा देशद्रोह्यांना पाकमध्ये हाकला ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) हे फलक लावल्यानंतर ते काढून टाकण्यात आले. या घटनेविषयी हिंदु सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता म्हणाले की, हे फलक लावण्यामागे आमचा देशद्रोह्यांना देशात थारा असू नये, असा उद्देश आहे. पोलीस या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत.

माझ्या मानेवर सुरी ठेवली, तरी मी भारतमाता की जय म्हणेन ! – नजमा हेपतुल्ला

नवी देहली : जरी कुणी माझ्या मानेवर सुरी ठेवली, तरी मी भारतमाता की जय म्हणणार, असे म्हणत केंद्रीयमंत्री नजमा हेपतुल्ला यांनी भारतमाता की जय म्हणण्यास नकार देणारे एम्आयएम्चे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर पलटवार केला आहे. लातूर जिल्ह्यात एका कार्यक्रमाच्या वेळी खासदार ओवैसी यांनी माझ्या गळ्यावर सुरी ठेवली, तरी मी भारतमाता की जय म्हणणार नाही, असे वक्तव्य केले होते. याप्रकरणी त्यांच्या विरोधात देशद्रोहाच्या आरोपाखाली एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *