नंदुरबार, सांगली, कोल्हापूर आणि मिरज येथे निवेदने
नंदुरबार : हिंदु जनजागृती समिती ही होळी आणि रंगपंचमी यानिमित्त होणार्या अपप्रकारांना रोखण्यासाठी प्रतिवर्षी जनप्रबोधन मोहीम राबवते. अपप्रकार करणार्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, होळी सण धर्मशास्त्रानुसार साजरा करण्यात यावा, तसेच या काळात पोलिसांच्या गस्तीची पथके सिद्ध करावीत, अशा मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक संजय पाटील यांना १८ मार्च या दिवशी देण्यात आले. या वेळी स्वदेशी जागरण मंचचे श्री. कपिल चौधरी यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सांगली/कोल्हापूर : होळी आणि रंगपंचमी या निमित्ताने होणार्या अपप्रकारांवर आळा घालावा आणि महिला सुरक्षेसाठी सहकार्य करावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांना निवेदने देण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी येथे नायब तहसीलदार श्री. विजय जमादार आणि पोलीस ठाण्यात कर्मचारी श्री. श्रीधर सावंत यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सचिन चौगुले, धर्मप्रेमी श्री. रमेश पडवळ, श्री. हैबत सोने, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक उपस्थित होते. शिरोळ येथे तहसीलदार श्री. गजानन गुरव आणि पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार सौ. देसाई यांना निवेदन देण्यात आले.
सांगली : जत तहसीलदार श्री. सचिन पाटील यांना, हरिपूर येथे सरपंच श्री. विकास शंकर हणबर यांना, संगमेश्वर देवस्थाचे सचिव श्री. उमाकांत बोंद्रे आणि संगमेश्वर देवस्थानचे अध्यक्ष श्री. परशराम शेरीकर यांना निवेदन देण्यात आले.
मिरज : येथील प्रांत कार्यालयातही निवेदन देण्यात आले.