रंगपंचमीच्या काळात अपप्रकार होऊ नये, याची दक्षता घेऊ ! – पोलीस निरीक्षक मोहन जाधव
विटा (जिल्हा सांगली) : होळी आणि रंगपंचमी या काळात अपप्रकार होऊ नयेत, याची दक्षता घेऊ, तसेच पोलीस बंदोबस्तातही वाढ करू, असे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रंगपंचमीनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी त्यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी श्रीराम मंदिरचे श्री. महेश देशपांडे, श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. अमित गुळवणी, इस्कॉनच्या सौ. रोहिणी माने, निरंकारी संप्रदायाचे श्री. नरेश दुधाणे, श्रीमान हिंदवी प्रतिष्ठानचे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते. सांगली येथे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. त्रिगुण कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
उपपोलीस अधीक्षकांकडून समितीच्या कार्यकर्त्यांना होळीनिमित्त मार्गदर्शनासाठी निमंत्रण
वर्धा येथे जिल्हाधिकारी आणि उपपोलीस अधीक्षक यांना निवेदन
वर्धा : होळी आणि रंगपंचमी यांच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांवर आळा घालणे आणि महिला सुरक्षेसाठी सहकार्य करणे याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्ध्याचे जिल्हाधिकारी श्री. आशुतोष सलील अन् उपपोलीस अधीक्षक श्री. रवींद्र किल्लेकर यांना १६ मार्च या दिवशी देण्यात आले.
श्री. किल्लेकर यांनी समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत सकारात्मक चर्चा केली आणि २३ मार्च या दिवशी सामाजिक संघटनांनी होळीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले. त्यांनी होळीचे महत्त्व या विषयावर, तसेच त्या दिवशी होणारे अनुचित प्रकार थांबवण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने आमंत्रित केले आहे. निवेदन देतांना होळी सणानिमित्त बोंबा ठोकणे, अचकट-विचकट बोलणे, फुग्यात रसायनयुक्त पाणी भरून ते इतरांवर उडवणे, शिवराळ भाषा वापरणे या गोष्टींना आळा घालणे आणि त्या थांबवणे याविषयी प्रशासन या नात्याने आपण सहकार्य करावे, यादृष्टीने निवेदन देत आहोत, असे कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितले.
नंदुरबार येथे जिल्हाधिकार्यांना निवेदन
नंदुरबार : नंदुरबार येथे १६ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी श्री. नीलेश सागर यांना होळी आणि रंगपंचमी यांच्या काळात होणार्या अपप्रकारांवर आळा घालणे आणि महिला सुरक्षेसाठी सहकार्य करण्याविषयीचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी शिवप्रतिष्ठानचे श्री. दिलीप ढाकणे-पाटील, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सतिष बागुल, मयुर चौधरी, गणेश पाटील, अमोल ठाकरे, शुभम कलाल, नीलेश अहिरे उपस्थित होते.
पनवेल येथे होळी आणि रंगपंचमी यानिमित्त होणारे अपप्रकार रोखण्याविषयी पोलीस प्रशासनाला निवेदन
पनवेल : येथील खांदा वसाहत आणि कळंबोली येथे पोलीस प्रशासनाला होळी आणि रंगपंचमी यानिमित्त होणारे अपप्रकार रोखण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. खांदा वसाहतीतील पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस महानिरीक्षक श्री. अमर देसाई यांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे सर्वश्री अजय खोत, विलास डुबे आणि दीपक कुलकर्णी उपस्थित होते. कळंबोली येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. संजय पाटील, तसेच एस्.व्ही. बिले यांना निवेदन दिल्यावर त्यांनी समितीच्या कार्याची प्रशंसा केली. या वेळी समितीचे श्री. उमेश किचंबरे आणि धर्माभिमानी सर्वश्री संभाजी जावीर, कालिदास काविळ, मारुति गुरव, सागर चिंचवले, अमोल कालेकर आणि तेजस सोनावणे उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात